शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिकोना किल्ल्यावर सागवानी दरवाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:18 IST

सह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील किल्ले तुंगनंतर किल्ले तिकोना ऊर्फ वितंडगडालाही सागवानी दरवाजा बसविण्यात आला.

कामशेत -  सह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील किल्ले तुंगनंतर किल्ले तिकोना ऊर्फ वितंडगडालाही सागवानी दरवाजा बसविण्यात आला. या दरवाजाचा लोकार्पण सोहळा सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार व रवींद्र भेगडे यांच्या हस्ते झाले.सह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून लोकवर्गणीतून निधी जमा करून या दरवाजाची उभारणी करण्यात आली. रविवारी गडाच्या पायथ्याला ग्रामदेवताचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ढोल-ताशाच्या गजरात व शिवघोषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान गडावर झाले. मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र (आप्पा) भेगडे यांच्या हस्ते गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक करून शस्त्रपूजन करण्यात आले. बालेकिल्ल्यावर शाहीर वैभव घरत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहिरी सादर केली. तर प्रा. डॉ. प्रमोद बोºहाडे यांनी तिकोना ऊर्फ वितंडगडाच्या इतिहासाला उजाळा दिला.मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणाºया वास्तूंचे जतन होणे गरजेचे आहे. आपले गडकिल्ले शाबूत राहण्यासाठी सर्व स्तरांवरून मावळवासीयांनी प्रयत्न करावेत आणि स्थानिकांसह युवकांनी गडकिल्ले सुरक्षित करण्याचे आवाहन रवींद्र भेगडे यांनी केले, तर सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी झटणाºया हातांचे व संस्थांचे कौतुक केले.या वेळी सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे, अभिनेत्री शीतल ठेकळे, तळेगावचे नगरसेवक अमोल शेटे, विनीत भेगडे, नितीन घोटकुले, संदेश भेगडे, दत्तात्रय शेवाळे, कुणाल साठे, भास्कर खैरे, संगीता मोहळ, गडपाल सुजित मोहळ आदी उपस्थित होते. गणेश खुटवड यांनी सूत्रसंचालनकेले. श्रमिक गोजमगुंडे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या