शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:07 IST

अकोले येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे

अकोले - येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे, तरच कामगारांच्या जिवावर प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण होऊ शकणार आहे.गेल्या वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी दोनशे फुटांवर क्रेन तुटून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात चर्चेत आला होता. त्यामुळे अनेक संघटना आणि ग्रामस्थांनी दोन महिने अकोले येथील नदीजोड प्रकल्पाच्या पाच नंबर शॉप्टचे काम बंद पाडले होते. या घटनेनंतर अपघाताच्या घटना थांबल्या नसून अनेक कामगारांनागंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही कामगारांना जीवही गमवावा लागला आहे.काम करण्यासाठी लागणारा कामगार स्थानिकपेक्षा परप्रांतीय असल्याने घडलेल्या किरकोळ घटना लोकांपर्यंत समजत नसल्याचे येथील काम करणाºया लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या काझड हद्दीतील चार नंबर शॉप्टच्या ठिकाणी जमिनीपासून २४० फूट खाली खोदकाम सुरू असून या ठिकाणी दक्षिण ते उत्तर दिशेला पाचशे मीटरपर्यंत खोदाई सुरू आहे. याच प्रमाणात भादलवाडी हद्दीतदेखील खोदाई सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या या कामगारांच्या सुरक्षेबरोबरच स्थानिक लोकांनी राहत्या घराला हादरे बसत असल्याच्याही तक्रारी केल्या असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अनेक समस्यांना काम करणाºया कंपनीला तोंड द्यावे लागणार आहे.डोक्यात दगड पडून मृत्यूमागील आठवड्यात पुरुषोत्तमसिंग राममनोहरसिंग गौड (वय ३३, रा. बमराह वॉर्ड १९ चेनागिडी, जि. देवधरी, मध्य प्रदेश) या व्यक्तीच्या डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार नंबर ठिकाणी एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अजून नदीजोड प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो, तोपर्यंत किती लोकांना जीव गमवावा लागेल, याची पर्वा ठेकेदारांना नाही.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या