शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

विद्यापीठांमधून ग्रामीण, आदिवासी, दलित अभ्यासक्रम बंद व्हावेत : राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:55 IST

जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.

ठळक मुद्देसाहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने 'साहित्यिक कलावंत संमेलन'‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद

पुणे : जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत. कारण विद्यापीठात जाऊन विद्यार्थी तिथे जातच शिकतात आणि हे बाहेर पडणारे शिक्षित येडे पुन्हा समाजात जातवादच करीत राहतात, हा जो विरोधाभास आहे तोच खरा संघर्षाचा काळ आहे, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने १७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सहभाग घेतला.साहित्य मग ते कुठल्याही कालखंडातील असो ते आजही वाचले जाते. एकही असा मराठी माणूस सापडणार नाही त्याच्याकडे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी सापडणार नाही. मात्र किती लोकांनी ती वाचली हा खरा प्रश्न आहे? शासनाने महात्मा फुले यांचे समग्र ग्रंथ काही वर्षांपूर्वी १० रूपये किंमतीत विकले, ते घेण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडले. एवढे खंड जर विकले गेले असतील मग समाजात क्रांतीच व्हायला काय हरकत होती. आज शाहू-फुले आंबेडकर ही समाजात केवळ एक म्हण ठरली असून, त्याचा तुळीसारखा वापर होतो आहे असे सांगून ते पुढे म्हणाले १९८०च्या दशकानंतरच्या साहित्याचा आढावा घेतला तर त्या काळातील साहित्य हे फदफदे होते. साहित्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आणि मूल्यवस्थेचा प्रभाव पाहायला मिळतो. मात्र व्याख्यानांमधून ही नावे उच्चारताना चोखंदळपणे विचार केला जातो. त्याकाळात या चळवळी एकीकडे स्वत: चा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होत्या तर दुसऱ्या बाजूला जात आणि धर्म अशी टोकाची कर्मठताही आली. साहित्य हे अशा जातीपातीत विभागले जाणे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आज अशी स्थिती आहे की विद्यापीठं, पुरस्कार सोहळे, सत्कार समारंभ हे जातीयतेत बाटले गेले आहेत. कोणत्या जातीच्या उमेदवाराला किती मते पडतील हे जाहीरपणे लिहिले जात आहे. यातच सध्या मुस्लीम साहित्याची स्थिती पाहिली तर त्यांच्या साहित्यामध्ये मूल्यव्यवस्थेवर केलेले भाष्य वाचायला मिळत नाही. देशात अन्याय होणारी ही एकच जात आहे जी एका विचित्र कोंडीत सापडली आहे. केवळ धर्माच्या गोडगोष्टी ते साहित्यातून मांडत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.इंदुमती जोंधळे म्हणाल्या, की साहित्य परिवर्तनाची व्याप्ती बहुआयामी आहे. अर्थपूर्ण छटा साहित्यामधून प्रतिबिंबित होत आहेत. लेखक हा संवेदनशील आणि विश्लेषक असावा लागतो. अर्थकारण, राजकारण, कृषी अभ्यासपूर्ण मांडणारी कलाकृती साहित्यात निर्माण झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात बोलताना समाजाचे प्रतिबिंब साहित्यात दिसते, समाजाला साहित्यातून दूर केले तर असे साहित्य समाजात सरपटणारे झुरळ होईल, ज्याचा समाजाला काही उपयोग होणार नाही, असे उत्तम कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे