शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या आरोग्यासाठी धावणे गरजेचे - मेजर जनरल माधुरी कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 02:04 IST

आजच्या धकाधकीच्या जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे.

पुणे  - आजच्या धकाधकीच्या जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मॅरेथॉन किंवा लाँग डिस्टन्स रनिंग हा प्रकार शरीरासाठी फायदेशीर असून प्रत्येकानी रोज धावणे गरजेचे आहे, असे मत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. ‘लोकमत’ने आयोजित केलेला महामॅरेथॉन हा चांगला प्रयोग असून नागरिकांनी यात जरूर सहभागी व्हावे आणि फिट राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअ‍ॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉन १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आली आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.‘लोकमत’शी संवाद साधताना कानिटकर म्हणाल्या, व्यायामाचा कुठलाही प्रकार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे केवळ शरीरच चांगले राहत नाही तर मनही चांगले राहते. आज मोठ्या प्रमाणात जीवनशैली बदलली आहे. लोक बाहेरच्या खाण्याला पसंती देत आहेत. या बरोबरच बैठी कामेही वाढली आहेत. यामुळे ब्लड पे्रशर, डायबिटिज, मेंटल स्ट्रेस या सारखे आजार वाढत आहेत. या आजारांमुळे कीडनी फेल होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत. यासाठी मॅरेथॉन किंवा लाँग डिस्टन्स रनिंग ही महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासाठी रोज ३० ते ४० मिनिट देणे गरजेचे आहे. याचा मोठा फायदा मानवी शरीराला होतो.धावताना आपला श्वास फुलणार नाही, याची काळजी घेतल्यास या प्रकारचे धावणे हे शरीराला चांगलेच फायदेशीर ठरते. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागृतीसाठी या सारख्या स्पर्धा आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. यामुळे ‘लोकमत’च्या या स्तूत्य उपक्रमाचा सर्वांनीच फायदा घ्यावा.

टॅग्स :Puneपुणे