मोरगाव : चलनातील पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्याने ग्रामीण भागातील दैनदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यात भर म्हणून सोशल मीडियामधून १९७६चा कमाल जमीनधारण कायदा पुढील महिन्यात लागू होणार असल्याचा संदेश फिरत असल्याने, नक्की ही अफवा की सत्य? या गोंधळाने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. चलनातील जुन्या पााचशे व हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबरपासून रद्दबातल झाल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर या बाबतचेही विविध संभ्रम असलेले संदेश व्हॉट्सअॅपमार्फत घरोघरी पोहोचत आहेत. यातच भर म्हणजे, १९७६च्या सिलिंग अॅक्टचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. मोरगावसह तरडोली, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांत जिरायती जमिनीचे प्रमाण मोठे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (वाार्ताहर)
‘सिलिंग अॅक्ट’च्या अफवेने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ
By admin | Updated: November 16, 2016 02:52 IST