शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विधी शाखेच्या ‘लॉ ऑफ क्राइम’ची परीक्षा पुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:19 IST

विद्यापीठावर नामुष्की : विद्यापीठानेच अधिकृतपणे फोडली प्रश्नपत्रिका

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेच्या प्रथम वर्षातील पहिल्या सत्राचा ‘लॉ ऑफ क्राइम’ या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी हा प्रकार विद्यापीठाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर अखेर त्या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा विभागाचा सावळा गोंधळ गेल्या दीड वर्षापासून सातत्याने सुरू आहे. यापार्श्वभुमीवर परीक्षेपूर्वीच ‘लॉ आॅफ क्राइम’ या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्याचा प्रकार घडला आहे. विद्यापीठाने अखेर याप्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडून खुलासा मागविला आहे. या प्रकराला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असून त्यानुसार संबंधितांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘लॉ आॅफ क्राइम’ या विषयाची परीक्षा १५ व १६ फेब्रुवारी रोजी पार पडली. मात्र परीक्षेपूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील ही प्रश्नपत्रिका पाहिली होती. त्यामुळे विद्यापीठानेच प्रश्नपत्रिका अधिकृतपणे प्रश्नपत्रिका फोडल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. त्यानुसार या विषयाची परीक्षा पुन्हा घेणे, याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणे, यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत.परीक्षेची तारीख व वेळ नंतर जाहीर करणारचौकशी समितीच्या अहवालानुसार विधी प्रथम वर्षाच्या लॉ आॅफ क्राइम या प्रथम सत्रातील विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणर आहे. याबाबत परीक्षेची तारीख, वेळ याबाबत विद्यार्थ्यांना व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना योग्य वेळी सूचना देण्यात येतील असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या परीक्षा होण्यापूर्वीच त्या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या चुकीचा मोठा फटका विधी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना पुन्हा आणखी एक पेपरच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या या गैरकारभारावर विधी विभागाच्या विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणे