शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:25 IST

उपहास, उपरोध, तिरकसपणा याचबरोबर मिस्कीलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या. या पाट्या म्हणजे पुणेकरांचा कॉपीराईटच जणू

पुणे : उपहास, उपरोध, तिरकसपणा याचबरोबर मिस्कीलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या. या पाट्या म्हणजे पुणेकरांचा कॉपीराईटच जणू. पुणेकरांची उत्तुंग रसिकता, अफाट गर्दी आणि अभूतपूर्व प्रतिसादाची अनुभूती रविवारी घेता आली. पुणेकरांच्या खुमासदार ‘पाटी’लकीची झलक लोकमततर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनात पहायला मिळाली.एक-दीड तास रांगेत उभे राहून नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. ही रांग नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या फुटपाथपर्यंत पोहोचली होती.एखाद्या प्रदर्शनासाठी रांगाच रांगा लावण्याची ऐतिहासिक घटना पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. सर्वांना लाभ घेता यावा, यासाठी प्रदर्शनाची वेळ ८ ऐवजी रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आली.बौध्दिक कौशल्य, टोमणे आणि उपदेशांचे माहेरघर म्हणजे पुणे. इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ हे कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात २३ आणि २४ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने त्याचे आयोजन करण्यात आले. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत.पुणेरी पाट्यांचे पुस्तक हवे!पुणेरी पाट्यांचे पहिलेवहिले प्रदर्शन भरवून ‘लोकमत’ने इतिहास घडवला आहे. या पाट्यांच्या आठवणी कायमच्या मनावर कोरल्या जाव्यात यासाठी ‘लोकमत’ने या पाट्यांचे संकलन करुन ते पुस्तक स्वरुपात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी अनेक वाचकांनी केली.सेल्फींचा पाऊस!सर्व वयोगटातील पुणेकरांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आवडत्या पाटीसह सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.