शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

चोरीच्या आरोपामुळे रुबीतील कर्मचाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: August 26, 2015 04:33 IST

चोरीच्या खोट्या आरोपामुळे वैतागलेल्या रुबी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ताडीवाला

पुणे : चोरीच्या खोट्या आरोपामुळे वैतागलेल्या रुबी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ताडीवाला रस्ता भागात ही घटना घडल्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. या वेळी संतप्त कुटुंबीयांसह नागरिकांनी दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व मृताच्या पत्नीस नोकरी द्यावी, अशी मागणी केली. या वेळी जमावाने घोषणाबाजी केल्याने व मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दुपारी ४ वाजता रुबी व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याचे मृताच्या नातेवाइकांनी मान्य केले.मोहन प्रकाश सोनवणे (३६, रा. ताडीवाला रोड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते रुबी रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात आॅफिसबॉय म्हणून कामास होते. ४ आॅगस्ट रोजी मोहन यांनी एका कपाटातून दोन लाख रुपये चोरल्याचा आरोप रुग्णालयातील कॅथलॅबमधील कर्मचारी रघुनाथ कुचिक यांनी केला. पण, काही दिवसांतच कुचिक यांना पैसे कपाटाच्या खाली सापडले. त्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून व सुरक्षा यंत्रणेकडून मोहन यांना मानसिक त्रास झाल्याने वैतागून त्यांनी गळफास घेतला, असा आरोप मोहन यांच्या नातेवाइकांनी केला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयातून मृतदेह ताब्यात न घेतल्याने तणाव निर्माण झाला. परिसरातील राजकीय नेत्यांसह कुटुंबीयांची व्यवस्थापनाशी बोलणी सुरू होती. दुपारी ४ पर्यंत व्यवस्थापनाकडून दाद मिळाली नाही. मृताच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृताच्या कुटुंबीयांना लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्याने मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य करण्यात आले. स्थानिक नगरसेवक प्रदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल तायडे, दलित पँथरचे सुखदेव तात्या सोनवणे, प्रकाश साळवी, स्वीकृत सदस्य सुजित यादव, जोगदंड, मनसे युवा नेते धनंजय कांबळे, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळेंसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांची समजूत काढली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. बंडगार्डन पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, निरीक्षक अजित चौधरींसह व्यवस्थापनाकडून बनसोडे आणि इराणी हे दोघे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीस आले होते. इतकी रक्कम एखाद्या कर्मचाऱ्याकडे कशासाठी, पैसे रुग्णालयात ठेवण्याचे कारण काय, पैसे ज्याचे जातात त्याच्याच जवळच्या व्यक्तीला सापडतात कसे काय आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी सर्वपक्षीयांनी केली. (प्रतिनिधी)राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्नशिवसेनेच्या कामगार आघाडीचे प्रमुख रघुनाथ कुचिक यांनी दुपारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविला. ते म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे आपण या रुग्णालयात काम करतो. मी शिवसेनेचा नेता असल्याने माझ्यावर आरोप करणारे माझे राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहन यांच्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याची चौकशी करण्याची मागणी मी करीत आहे.’’कुचिक म्हणाले, ‘‘पैसे चोरीला गेल्यानंतर मी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापनाकडे याची चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली होती. त्यानंतर चोरीस गेलेल्या पैशांपैकी काही पैसे ड्रॉवरखाली आढळले. उरलेल्या पैशांबाबत ४० जणांची सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू होती. मी त्या अर्जात कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे अन्य काही कारण आहे का, याची चौकशी केली पाहिजे. मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे.’’