शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयात सोमवारी शुकशुकाट

By admin | Updated: November 15, 2016 03:15 IST

केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्याचा फटका आरटीओ कार्यालयासह अनेकांना बसला आहे़ आरटीओ कार्यालयाकडून दर दिवशी लाखोंचा

पिंपरी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्याचा फटका आरटीओ कार्यालयासह अनेकांना बसला आहे़ आरटीओ कार्यालयाकडून दर दिवशी लाखोंचा कर शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो़ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अधिक कर जमा होण्याच्या हेतूने सोमवारी गुरूनानक जयंतीनिमित्त सुटीचा दिवस असूनही आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते़ मात्र, नागरिकांसह एजंटाकडे सुटे पैसे नसल्याने आणि काहीही व्यवहार नसल्याने सोमवारी आरटीओ कार्यालयात शुक शुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले़ एरवी वाहनांच्या नोंदी, पसंतीचे क्रमांक, वाहन परवाना, विविध कागदपत्रांची नावनोंदणी करण्यासाठी नागरिकांची झुंबड आरटीओ कार्यालयात होत असते़ अक्षरक्ष: उभा राहण्यासाठी नागरिकांमध्ये तू-तू, मै-मै झाल्याचे अनेक प्रकार घडले आहे़ मात्र, मंगळवारपासून केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे एजंटासह अनेकांचे धाबे दणाणले आहेत़ आरटीओ कार्यालयातील बहुतांश विभागात रोख आणि आॅनलाइन भरणा केला जातो़ सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस सुटीचा असतानाही नागरिकांकडून पाचशे आणि हजारांच्या नोटा भरण्याच्या अपेक्षेने आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते़ मात्र, किरकोळ भरणा वगळता आरटीओ कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला़ मागील पाच ते सहा दिवसांपासून आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरकांची संख्या तुलनेने खूपच कमी झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली़ (प्रतिनिधी)