शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

प्रशिक्षणावर २१ लाख रुपयांचा खर्च, अहमदाबाद येथील संस्थेवर मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:51 IST

अहमदाबाद येथील एका संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार म्हणजे वार्षिक २१ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे

पुणे : अहमदाबाद येथील एका संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार म्हणजे वार्षिक २१ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे. त्याबदल्यात ही संस्था महापालिकेच्या विविध विभागांतील अभियंते, शहररचनाकार तसेच कंत्राटदारांनाही त्यांच्या कामाचे प्रशिक्षण देण्याचे काम करेल.अहमदाबाद स्थित सेंटर फॉर एन्व्हायरनमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथ विभाग, बांधकाम विभाग, प्रकल्प विभागा, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणारे अभियंते, शहरचनेशी संबंधित अभियंते, महापालिकेचे सल्लागार व कंत्राटदार यांनाही या संस्थेच्या वतीने त्यांच्या कामकाजासंबधीची आधुनिक माहिती दिली जाईल. त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण ही संस्था वर्षभर त्यांना देईल.त्याबदल्यात संबंधित संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार रुपये महापालिकेने द्यायचे आहेत. वार्षिक २१ लाख रुपयांचा खर्च करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीला दिला आहे. समितीच्या येत्या मंगळवारच्या सभेत त्यावर चर्चा होईल. समिती याबाबत काय निर्णय घेते, याविषयी अन्य नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका