शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतीच्या ‘जीआयएस’ मॅपिंगवर १२ कोटींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 04:30 IST

सर्व्हेसाठी २६२ कामगार नियुक्त; मात्र, महापालिकेने २ हजार १६२ कामगारांचे काढले बिल

पुणे : महापालिका हद्दीतील ८ लाख मिळकतीचा ‘जीआयएस’ मॅपिंगद्वारे नऊ महिन्यांत सर्व्हे करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण न करताच तब्बल १२ कोटी रुपये बिल देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने सर्व्हेसाठी २ हजार १६२ कामगार नियुक्त करणे आवश्यक असताना केवळ २६२ कामगार नियुक्त करून महापालिकेची फसवणूक केली आहे. तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता सर्वसामान्य करदात्यांच्या निधीची उधळपट्टी केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.महापालिकेने सन २०१६ मध्ये महापालिका हद्दीतील १० लाख मिळकतीचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी सारा टेक्नालॉजी व सायबर टेक या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. या कंपन्यांनी हे काम ९ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. त्याकरिता त्यांनी २१६२ माणसे या कामावर नेमणे अपेक्षित होते. याच गोष्टीसाठी इतर महानगरपालिकांपेक्षा दुप्पट दराने हे काम संबंधित कंपन्यांना देण्यात आले. हे काम जवळपास दोन वर्षांत निम्मेही झाले नसल्याने महापालिकेने हे कंत्राट रद्द केले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराची बिले अदा केली. ही बिले मान्य करताना कामगार कल्याण विभागाने संबंधित कंत्राटदाराने २१६२ माणसे कामावर ठेवली होती, याचे कोणतेही पुरावे घेतलेले नाहीत. तसेच एकच मिळकत वेगळ्या वेगळ्या बिलात दोनदा दाखवलेली नाही (दुबार) याची कोणतीही शहानिशा संबंधित कर संकलन विभागाने केलेली नाही. असे असताना कोट्यवधी रुपयांची बिले देण्यात आली.संबंधित ठेकेदाराला अखेरचे बिल देण्यासाठी पहिल्यापासून आतापर्यंतच्या बिलातील २१६२ कामगार कामावर असल्याचे पूर्ण पुरावे द्यावेत. त्याच मिळकतीचे सर्व्हेचे बिल दुबार दिले गेले नसल्याचे करसंकलन विभागाचे अभिप्राय घेणे बंधनकारक करावे. तोपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी संपूर्ण प्रकरणाची खात्री केल्याशिवाय बिल देऊ नये असे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले. परंतु त्यानंतर देखील कोणतीही खातरजमा न करता अधिकाºयांनी शिल्लक ४ कोटी ५० लाख रुपयांचे बिल आदा करून टाकले. अधिकाºयांनीदेखील कोणतीही खातरजमा न करता सर्व बिल अदा केली आहेत. या कंपन्यांच्या मागे राज्यातील वरिष्ठ मंत्र्याचे पाठबळ असल्याने काम पूर्ण न करताच संबंधित कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याची चर्चा आहे.माहिती अधिकारात झाले उघडमाहिती अधिकारात कंत्राटदाराने सादर केलेली कागदपत्रे तपासली असता सर्र्व्हेसाठी २ हजार १६२ ऐवजी केवळ २६२ कामगार कामावर असल्याचे पुरावे सादर केले.प्रतिमिळकत ३३० रुपये दर निश्चित करताना २ हजार १६२ कामगारांचे प्रति २०० रुपये वेतन लक्षात घेऊन १२ कोटी रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु एकच मिळकत दुबार दाखवून व २ हजार १६२ कामगारांऐवजी २६२ कामावर असताना खोटे पुरावे देऊन महापालिकेची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका