शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला १० हजार कापले जाणार; आयुक्तांनी सुनावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 21:06 IST

कामातील हलगर्जीपणा भोवला; पुढील २ वर्षे पगारकपात होणार

पुणे : विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याने विरार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी मासिक पगारातून दरमहा १० हजार रुपये इतकी रक्कम २ वर्षे कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे.विरारमध्ये ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सीआयडीने युनूस शेख यांना मार्च २०१८ मध्ये अटक केली होती. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता त्यांची पुण्यात नियुक्ती झाली असल्याने विभागीय चौकशीचा अहवाल पुण्यात पाठविण्यात आला होता.याबाबतची माहिती अशी, युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या, केवळ नावात साम्य असलेल्या ३ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रे ही नियोजित हद्दपार इसमाचीच असल्याची खातरजमा न करता पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. भावाला न्याय मिळावा, यासाठी दोन महिने प्रयत्न केल्यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने २० जानेवारी २०१८ रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतरही त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असे त्यांच्यावर आरोप ठेवले. तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाºयास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून २ वर्षे दरमहा १० हजार रुपये कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे.