शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमधून पत्रा पडून घराच्या छताचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 22:22 IST

पुणे, दि.8 - आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताचा काही भाग पडल्याची घटना हडपसर ...

पुणे, दि.8 - आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताचा काही भाग पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये घडली. घराच्या पत्र्यावर पडलेली ही वस्तू थेट पोटमाळ्यावर पडून छताला भोक पाडत सर्वात खालच्या खोलीत पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी रामटेकडी झोपडपट्टीवरून एक हेलिकॉप्टर उडत जात होते. या हेलिकॉप्टरमधून हिरव्या रंगाची आणि अर्धगोलाकार आकाराची चपटी वस्तू खाली पडली. प्रचंड वेगात खाली आलेला पाच ते सहा किलोचा हा पत्रा एका घराच्या छताच्या पत्र्यावर पडला. पत्रा फाडून ही वस्तू पोटमाळ्याच्या स्लॅबवर आदळली. त्यामुळे स्लॅबला भगदाड पडले. या भगदाडामधून ही वस्तू थेट सर्वात खालच्या खोलीमध्ये जाऊन पडली. स्वयंपाक घर असलेल्या या खोलीत सुदैवाने कोणीही नव्हते. स्थानिकांनी लष्कराचे हेलिकॉप्टर असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. हडपसर, मुंढवा याभगतील एमआयडीसी परिसरात बड्या कंपन्या आहेत. यासोबतच लष्कराचा मोठा भाग आहे. येथील काही उद्योजक हेलिकॉप्टरचा नेहमी वापर करतात. तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरचीही वर्दळ असते. त्यामुळे हे हेलिकॉप्टर नेमके कोणाचे होते याबाबत स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू असून घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.