शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

भूमिका पक्षप्रवक्त्यांची

By admin | Updated: October 11, 2014 06:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील १५ वर्षांचा गैरकारभार आणि भाजपाचे सरकार आल्यावर, त्यात काय बदल करू शकतो़ एका वर्षात राज्यातील भारनियमन दूर करणे

काँग्रेसचा विशेष भर सकारात्मक प्रचारावर - अनंतराव गाडगीळपुणे : काँग्रेस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रातील जनतेला कसा फायदा झाला, सुख-सुविधा कशा उपलब्ध झाल्या या सकारात्मक प्रचाराबरोबरच भारतीय जनता पक्षाची लोकसभेच्या वेळची भूमिका व आताची भूमिका यातील बदल, अशा दोन पातळीवर काँग्रेसचा प्रचार केला जात आहे़ काँग्रेसने सर्व विभागीय पातळीवर पत्रकार परिषदा, कार्यकर्ता मेळावे, बैठकीच्या माध्यमातून निवडणुका दरम्यान पक्षाची भूमिका काय असेल, हे स्पष्ट केले़ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा २ लाख ८० हजार गरीब नागरिकांना फायदा झाला़ शिक्षण हक्क कायद्याद्वारे १ कोटी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळू लागले आहे़ तसेच, विविध विकासकामे जनतेसमोर मांडली जात आहे़ मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी डीसीआर ३७ लागू करण्याची मागणी केली आहे़ माहिती अधिकार कायद्यामुळे आम्हाला अनेकदा अडचणी आल्या़ तरीही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यातील पारदर्शकता कमी करण्यास विरोध केला होता़ ज्यांनी आपल्या परदेशी दौऱ्यात एकाही पत्रकाराला बरोबर नेले नाही़ त्यांचा कारभार पारदर्शी कसा म्हणता येईल़ अणुऊर्जा हाच एकमेव पर्याय असल्याचे मोदींनी सांगितले, शिवसेनेचा मात्र जैतापूरला विरोध आहे, हा विरोधाभासही आम्ही जनतेसमोर आणतो आहे़ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा आता सुरू झाल्या आहेत़ लोकसभेच्या तुलनेत नक्कीच मोठा बदल होत आहे़ ‘सोशल मीडिया’वर राष्ट्रवादीची मदार अंकुश काकडे - पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेते संपूर्ण राज्यात प्रचार करीत असून, यंदा ‘सोशल मीडिया’वरून प्रचारालाही भर दिला आहे़प्रमुख नेते राज्यभरात सभा घेत असून, पक्षाने केलेल्या कामांची माहिती या सभांमधून दिली जात आहे़ त्याचबरोबर पक्षावर होणाऱ्या टीकेलाही तातडीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे़ स्वत: शरद पवार हे पक्षावर होणाऱ्या टीकेला वेळोवेळी सभा व पत्रकार परिषदेतून उत्तर देत आहेत़ ‘सोशल मीडिया’वर व्हॉटसअप, फेसबुकवरून प्रत्येक उमेदवाराची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ एफएम रेडिओवरून पक्षाच्या उमेदवारांच्या जाहिराती सुरू झाल्या असून, त्याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे़ ज्या उमेदवारांनी पक्षाच्या नेत्यांच्या सभा, रोड-शोची मागणी केली आहे़, अशांसाठी अजित पवार यांच्या रोड-शोचे आयोजन करण्यात आले आहे़ याशिवाय सुप्रिया सुळेही पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व इतरत्र सभा घेत आहेत़ सर्व उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघानुसार प्रचारफेरीसाठी आवश्यक ती मदत केली आहे़ दर २ दिवसांनी शहरातील कोअर कमिटीची बैठक होत असते़ राज्यात पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.शिवसेनेचा जोर ‘व्हिजन डॉक्युमेंट’वर -  नीलम गो-हेपुणे : संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या प्रचाराचे तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार प्रचार सुरू आहे़ शिवसेना भवनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांचे नियोजन केले गेले आहे़ गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू करण्यात आली आहे़ प्रत्येक जिल्ह्यात गटप्रमुख नेमण्याचे काम स्वत: उद्धव ठाकरे यांनी मुलाखती घेऊन केले़ त्या त्या मतदारसंघात संपर्कप्रमुखांना मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना कार्यरत केले आहे़ विद्यमान आमदारांकडे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणांच्या सीडी आहेत़ त्यांना आपल्या कामाचा आढावा घेणारे अहवाल प्रकाशित करण्यास व त्यात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, याची माहिती पक्षपातळीवरून देण्यात आली होती़ युती तुटल्यानंतर अनेक मतदारसंघांत नवीन उमेदवार उभे राहिले आहेत़ त्यांच्यासाठी पक्षातर्फे अधिक प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी ज्या जागा शिवसेनेकडे नव्हत्या, तेथे संघटनाबांधणी करून जुन्या मतदारांना पुन्हा एकत्र करण्याचे काम सुरू झाले आहे़ दररोज होणाऱ्या घडामोडींची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत असतो़ ज्या ठिकाणी ठाकरे यांचे दौरे उशिरा आहेत़ त्या भागात पक्षाचे ७ ते ८ प्रमुख नेते दौरे करीत आहेत़ सर्व भागात समतोल प्रचारावर भर आहे. प्रचारात प्रामुख्याने ‘व्हिजन डॉक्युमेंट’वर भर दिला आहे़ याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या सभांमधून अनेक सवाल-जबाब होत आहेत़ त्यांनी मुलाखती देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे़ दुहेरी पातळीवर भाजपाचा प्रचार - माधव भंडारीपुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील १५ वर्षांचा गैरकारभार आणि भाजपाचे सरकार आल्यावर, त्यात काय बदल करू शकतो़ एका वर्षात राज्यातील भारनियमन दूर करणे, अशा विविध विषयांवर भर दिला जात आहे़ अशा प्रकारे भाजपा २ पातळीवर प्रचार करीत असून, राज्यभरात पक्षाला विलक्षण प्रतिसाद मिळत आहे़ पक्षाचे गाव, बूथपातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे पक्षसंघटन आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे़ हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही़ त्याबरोबरच राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा मोठ्या होत आहेत़ आघाडी सरकारच्या गैरकारभारावरच आमचा प्रचाराचा मुख्य झोत असणार आहे़ आमचे सरकार आल्यानंतर एका वर्षात आम्ही काय काय करू शकतो, कोणत्या गोष्टींमध्ये बदल घडवायचा आहे, याची माहितीही सभांमधून दिली जातेक़ेंद्रीय नेते, मंत्री यांच्या पत्रकार परिषदा, विविध समाजघटकांबरोबरच्या बैठका घेण्यात येत असून, त्यातून पक्षाची भूमिका मांडली जात आहे़गेल्या काही महिन्यांत भाजपामध्ये नवीन लोक मोठ्या संख्येने आले आहेत़ त्यांना सामावून घेण्याचे आव्हानात्मक काम आहे़ काही ठिकाणी जुने-नवे असा वाद आहे़ सर्व ठिकाणी हा दुवा सांधला गेला असेल, असे सांगता येणार नाही़ पण, प्रयत्न केला जात आहे़ राज्यात २५ वर्षांनंतर प्रथमच आम्ही १६९ जागा लढवतोय़ त्यापैकी ३१ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत़ आम्ही २५७ जागा लढतोय, त्यामुळे अनेकांना प्रथमच संधी मिळाली आहे़ मनसेचा मुख्य मुद्दा   - अनिल शिदोरे‘ब्लू प्रिंट’च राहणारपुणे : महाराष्ट्राचा सर्वांगीण विचार करून, येत्या काळात हे राज्य कसे असावे, या दृष्टीने आम्ही केलेली ‘ब्लू प्रिंट’ हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असून, त्यावरच सर्व भर दिला जात आहे़ राज ठाकरे यांच्या सभांना शहरी भागात नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो़ विदर्भ, मराठवाड्याचा आमचा दौरा पूर्ण झाला असून, त्या ठिकाणच्या ग्रामीण भागातही यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे़ पक्षाच्या ‘ब्लू प्रिंट’मध्ये राज्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत़ ही ‘ब्लू प्रिंट’ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी कार्यकर्ते जात आहे़ त्यासाठी पक्षाने हजारी बांधणी केली असून, गटाध्यक्षाच्यामार्फत ती घरोघरी पोहोचवली जात आहे़ ‘ब्लू प्रिंट’ हा इतका मोठा विषय आहे़, की त्या त्या भागातील स्थानिक विषयांवर या ‘ब्लू प्रिंट’मध्ये काय म्हटले आहे- हे मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे़ स्थानिक परिस्थितीनुसार त्यातील काही मुद्दे प्रत्येक जण उचलून धरत आहे़ राजकीय मुद्द्यांमध्ये पंतप्रधानपदावरील व्यक्तीने राज्याच्या निवडणुकीत इतके पडायची काय गरज आहे, यावर भर दिला आहे़ त्याचबरोबर गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत येऊन येथील उद्योगपतींशी त्या जे बोलल्या, त्याला आम्ही जोरदार विरोध करीत आहोत़ पक्षस्थापनेपासून असलेले अनेक उमेदवार आहेत़ त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांशी चांगली नाळ जुळलेली आहे़ राज्यात आम्ही २२५ उमेदवार उभे केले आहे़ त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे़