शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

रोहित्र दुरुस्तीमुळे सासवडचा पाणीपुरवठा होणार नियमित

By admin | Updated: March 25, 2017 03:33 IST

सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर पाणीपुरवठा योजनेचा कांबळवाडी येथील रोहित्र जळाल्यामुळे सासवडचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होता.

सासवड : सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर पाणीपुरवठा योजनेचा कांबळवाडी येथील रोहित्र जळाल्यामुळे सासवडचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होता. नगरपरिषदेने तातडीने रोहित्र मिळविण्याची व्यवस्था केल्याने आज (दि.२५) रोजी रोहित्र बसविणार असल्याने सायंकाळपर्यंत वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली.रोहित्र मागणीसाठी वीज वितरण कंपनीला नगरपरिषदेने विनंती केली होती. नगर पालिकेचे रोहित्र दुरुस्तीसाठी दिले असून ते दुरुस्त होईपर्यंत वीज वितरण कंपनीचे रोहित्र वापरण्यात येणार आहे.सासवड शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यासाठी अंदाजे ५० लक्ष लिटर पाणी लागते. सध्या वीर धरण, घोरवडी धरण, गराडे तलाव यातून पाणी घेतले जाते. आता गराडे तलावात पाणी शिल्लक नाही. घोरवडीमधून दररोज दहा लक्ष लिटर पाणी मिळते व वीर धरणातून ४० लक्ष लिटर पाणी घेतले जाते. वीर योजनेचे पाणी बंद झाले आहे. मात्र घोरवडीमधून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सासवडकर नागरिकांना आज (शनिवार, दि.२५) रोजी पाणी मिळणार आहे, असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र नेहमी एक तास पाणी मिळते, त्या ऐवजी अर्धातास पाणी सोडण्यात येईल. शनिवारी कांबळवाडी येथे रोहित्र बसविल्यानंतर दुपारपर्यंत पाणीपुरवठा नियमित होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)