शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांच्या मदतीला रोडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:19 IST

चाचणीला सुरुवात : वाहतुकीवर राहणार रोबोटची नजर

पुणे : वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्याचा इशारा करणे आणि झेब्रा क्रॉसिंग पाळण्यास सांगणे आदी बाबींसाठी आता वाहतूक पोलिसांना रोडिओ हा रोबोट मदत करणार आहे.

शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोबोटचा प्रयोग राबविण्यात येत असून त्याची मंगळवारी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ चाचणी घेण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या चौकात हा रोबोट टप्प्याटप्प्याने ठेवण्यात येणार आहे. एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या ६ विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. बॅटरीवर चालणारा हा रोबोट काही तास चार्च केल्यास दिवसभर विविध मार्गांवर वाहतूक नियमनाचे काम करू शकतो. भविष्यात त्याला सीसीटीव्हीदेखील बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे भंग करणारे त्याद्वारे टिपता येतील, अशी माहिती एसपी रोबोटिक्स मेकरच्या खराडी लॅबचे प्रमुख संदीप गौतम यांनी दिली.

रोबोट चाचणीचे उद्घाटन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते केले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. आयुक्त म्हणाले, की डिजिटल बाबींचा वापर करण्यावर पुणे पोलिसांचा नेहमीच भर राहिला आहे. सध्या शहरातील काही रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर रस्त्यावरदेखील रोबोटची व्यवस्था केली जाणार आहे, तर उपायुक्त सातपुते म्हणाल्या, की येत्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात रोबोचा डेमो दाखविणार आहे. जनजागृती आणि सिग्नलवर थांबण्याचा इशारा करणे ही दोन प्रमुख कामे हा रोबोट करेल. त्याची मदत वाढविण्याच्या दृष्टीने त्यात अजून बदल करता येतील.

राज्यातील पहिलाच प्रयोगचेन्नईतदेखील अशा प्रकारचा रोबो तयार केला होता. त्याचा पोलिसांना मोठा फायदा होत आहे. त्यानंतर पुण्यात हा प्रयोग करण्यात येत आहे. राज्यातील वाहतूक पोलीस राबवित असलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. प्रत्यक्ष चाचणीनंतर शहरात अशा प्रकारे रोबोटच्या माध्यमातून नियमन शक्य आहे का? हे तपासले जाईल, असे गौतम यांनी सांगितले.६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची कमालएसपी रोबोटिक्स मेकरच्या ठाणे शाखेतील काहींचे मार्गदर्शन घेऊन पुण्यातील विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. त्यासाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यात बॅटरी बसविण्यात आली आहे. पूर्ण चार्ज झाल्यास ती दिवसभर चालू शकते.रचित जैन, शौर्य सेन, पार्थ कुलकर्णी, विनायक कृष्ण, श्रेतेन पांडे, आदिक कांचनकर आदी विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. राहुल माथूर आणि संदीप गौतम यांनी मार्गदर्शन केले.वाहतूक पोलिसांना प्रत्येक वेळी रस्त्यावर काम करीत असताना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करावा लागतो. तसेच त्यांना कामाची ठराविक वेळ दिलेली असते. मात्र रोबोटवर या सर्वांचा काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तो अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वास पार्थ कुलकर्णी या विद्यार्थ्याने व्यक्त केला.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी