शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:35 IST

विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पुणे - विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला़. पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक शाखा व महापालिकेचे विभागप्रमुख यांची तिसरी मासिक समन्वय बैठक पोलीस मुख्यालयात बुधवारी झाली. 

वाहतूककोंडी टाळण्यासाठी विमानतळातील पार्किंगमधून बाहेर पडल्यावर सिम्बायोसिसकडे जाणाºया रस्त्याचे काम होणार असून त्याचे काम १५ ते २० टक्के पूर्ण झाले आहे़ हा रस्ता लवकर पूर्ण झाल्यास विमानतळावर येणाºया व तेथून बाहेर पडणाºयांसाठी एकेरी मार्ग करणे शक्य होईल.

बैठकीत पुणे रेल्वे स्टेशन, नगर रोड, सातारा रोड, मंडई, कोंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, लष्कर, हडपसर, चतु:शृंगी, बाणेर रोड, स्वारगेट, कात्रज, सिंहगड रोड या भागाकडे वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण काढणे, डिव्हायडर दुरुस्ती, सिग्नल दुरुस्ती करणे, बेवारस वाहनांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, पुणे महापालिका व पोलीस विभाग भूसंपादन करायच्या जागेचे हस्तांतर तसेच पादचाºयांची सुरक्षा व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली़बैठकीला पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र जगताप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त अनिल मुळे, माधव देशपांडे, जयंत भोसेकर, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते़विमानतळ परिसरात येणारे व जाणाºयांसाठी एकच रोड असल्याने या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते़ त्यावर उपाययोजना करताना विमानतळातील पार्किंगमधून बाहेर पडल्यावर सिम्बायोसिसकडे जाणाºया रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला़सध्या या रस्त्याचे काम १५ ते २० टक्के पूर्ण झाले आहे़

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड