शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खोदाईची डेडलाइन नावालाच

By admin | Updated: June 1, 2015 05:36 IST

शहरातील सर्व खोदाईची कामे ३१ मेअखेर पर्यंत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार,

पुणे : शहरातील सर्व खोदाईची कामे ३१ मेअखेर पर्यंत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते बंडू केमसे यांनी बैठकांवर बैठका घेऊन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याला मुदतवाढ देऊन खोदाईची कामे सुरूच ठेवली आहेत. महावितरण, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा आणि एमएनजीएलच्या खोदाईस मुदतवाढ देण्यात आली आहे.पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडड्े पडून त्याचा प्रचंड त्रास दरवर्षी पुणेकरांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाईची कामे संपवू असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. रस्ते खोदाईची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत बंद करणे आवश्यक असताना, महावितरण, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा आणि एमएनजीएलला अधिकृतपणे मुदतवाढ प्रशासनाने दिली आहे. मुख्य रस्त्यांवरील खोदाईची कामे पूर्ण असली तरी अंतर्गत रस्त्यांवरील खोदाई सुरू आहे. शहरातील मध्य पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी नागरिकांना रस्ते खोदाईसंदर्भात माहितीफलके लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रस्ते खोदाई कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने परस्पर त्यांना मुदतवाढ दिल्याने कुणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)