शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता, रेशन दुकानातील भ्रष्टाचारावर सरबत्ती

By admin | Updated: May 15, 2016 00:39 IST

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाला दौंडपाठोपाठ बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बारामती : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाला दौंडपाठोपाठ बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात जोरदार वादळी पाऊस होऊनदेखील या कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. थेट नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने बारामतीकरांना मिळाली. शहरातील साठवण तलावापासून रस्ता, रेशन दुकानातील भ्रष्टाचार आदी विषयांवर वाचकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. शशांक मोहिते यांनी सुरुवातीला ‘लोकमत आपल्या दारी’ या माध्यमातून सामान्य नागरिकांना समस्या मांडण्याची संधी मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. मोहिते म्हणाले, की माझे एमआयडीसी परिसरात वास्तव्य आहे. बँक आॅफ महाराष्ट्र परिसरात मोठा ‘रेसिडेन्शीअल’भाग आहे. सुशिक्षित नागरिकांना काही दिवसांपासून सुरू झालेल्या लॉजमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी स्कार्प बांधून आलेल्या मुली, महिलांची, युवक आणि पुरुषांसमवेत सतत वर्दळ असते. याबाबत विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही. मात्र, या प्रकाराचा येथील रहिवाशांवर परिणाम झाला आहे. पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, नगरपालिका प्रशासनाने बाहेर हातगाड्यांवर उपलब्ध असणाऱ्या खाद्य पदार्थांची स्वच्छता ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. यावर पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे म्हणाले, की रजिस्टर नोंदणी अद्ययावत ठेवण्याबाबत पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाला सूचना दिल्या आहेत. याशिवाय नोंदणी पुस्तकाची नियमित तपासणी होते. आगामी काळात कडक तपासणी केली जाईल. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची माहिती, मोबाईल नंबर, ओळखपत्राच्या झेरॉक्स असणे बंधनकारक आहे, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. येथील नागरिकांची तक्रार दूर करण्याचा पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करेल. तर, नगराध्यक्ष जगताप म्हणाले, की नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने नुकतेच अतिक्रमण करून सुरू केलेले रस्त्यावरील व्यवसाय बाजूला घेण्यात आले. या व्यावसायिकांसाठी बारामती शहरात पहिला हॉकर्स झोन सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बसपाचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी त्यावर म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. बारामती शहरातील अनेक बड्या लोकांचे अतिक्रमण आहे. नगरपालिका प्रशासनाने प्रथम या मोठ्या लोकांवर अतिक्रमण कारवाई करावी. त्यानंतरच सर्वसामान्य व्यावसायिकांवर कारवाई करावी. मोठ्यांना सोडून गरिबांवर अन्याय करू नये. तांदूळवाडी परिसरातील जगन्नाथ जाधव म्हणाले, की जीवन प्राधिकरणकडून ८ ते १० हजार रुपये खर्च करून नळ जोड पाणीपुरवठ्यासाठी घेतला. त्या वेळी २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात हे आश्वासन पाळले गेले नाही. सध्या मध्यरात्रीदेखील पाणी सोडले जात आहे. रात्री उठून पाणी भरण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यातून चोरीसारखे प्रकार घडण्याची भीती आहे. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत नगर परिषद कार्यालयात बोलावून सूचना देऊ, असे सांगितले.