शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नदीकाठसंवर्धन म्हणजे भूखंडांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:30 IST

महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनाने सादर केलेला व सत्ताधा-यांनी उचलून धरलेला नदीकाठसंवर्धन म्हणजे १ हजार ७०० एकर भूखंडांच्या भ्रष्टाचाराचा महाघोटाळा आहे

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनाने सादर केलेला व सत्ताधा-यांनी उचलून धरलेला नदीकाठसंवर्धन म्हणजे १ हजार ७०० एकर भूखंडांच्या भ्रष्टाचाराचा महाघोटाळा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी केला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यात तथ्य नसल्याचा खुलासा करीत हा विषय मंजूर केला. त्यासाठी स्थापन करायच्या स्वतंत्र कंपनीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी विरोध केला.मूळ प्रस्ताव मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे या विषयावर मतदान झाले नाही. हा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. त्यात ४४ किलोमीटर अंतराचा नदीकिनारा संवर्धित व सुरक्षित करण्यात येणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी प्रशासन व सत्ताधाºयांचे वाभाडे काढले. हा शतकातील महाघोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. नदीकाठाची पूररेषा यात बदलण्यात येणार आहे. यातील बहुसंख्य जमीन पूररेषेत बांधकाम करता येणार नाही, या कायद्याने अडकली आहे. नदीकाठ संवर्धनाच्या प्रकल्पात पूररेषा बदलली जाईल. त्यामुळे सध्या या जमिनीवर असलेले निर्बंध कमी होतील. त्याचा फायदा कोणाला होणार आहे त्याचे उत्तर द्या, अशी टीका तुपे यांनी केली.या विषयावर मनसेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले, काँग्रेसचे अविनाश बागवे या गटनेत्यांबरोबरच विरोधातील सर्वच सदस्यांनी प्रशासन व सत्ताधाºयांना धारेवर धरले. भूखंड ताब्यात घेऊन तिथे इमारती उभ्या करण्याचा हा डाव आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक प्रयत्नशील आहेत व प्रशासन त्यांच्यासाठी काम करत आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली. नदीकाठसंवर्धनाचे काम करण्यासाठी म्हणून स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. या कंपनीत नदीकाठ परिसरात येणाºया पिंपरी-चिंचवड तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार आहे.कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा आतापर्यंतचा अनुभव चांगला नाही. सगळी कामे पालिका करीत असताना कंपनी कशासाठी, असा विरोधकांचा सवाल आहे.