शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नदी सुधारणेची ऐसीतैशी : स्मार्ट योजना कागदावर, कृती शून्य; पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 05:09 IST

नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

पुणे : नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्याच वेळी नदी स्वच्छतेसाठी पूर्वापार अवलंबल्या जाणाºया छोट्या मात्र महत्त्वाच्या बाबींकडेही पालिकेकडून मोठ्या प्रमाणातदुर्लक्ष होत आहे. शहरातीलपुलांवर तसेच नदीपात्राच्या बाजूने ठेवण्यात आलेले निर्माल्य कलश गायब झाले असून, त्याकडे लक्ष देण्यात पालिका प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही.शहरात सध्या नवरात्रोत्सवाची धूमधाम सुरू आहे. उत्सवाच्या काळात घराघरातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. निर्माल्य संकलित करण्यासाठी पालिकेकडून शहरात ठिकठिकाणी कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अचानक हे कलश गायब झाल्याने शहरात दररोज संकलित होणारे शेकडो टन निर्माल्य थेट नदीमध्ये पडू लागले आहे. त्याचबरोबर काही जणांकडून ते नदीत न टाकता ते पुलावरच पूर्वी ठेवण्यात आलेल्या कलशांच्या जागेवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे तिथे निर्माल्यांचे ढीग साचू लागले आहेत.प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले हे निर्माल्य इतरत्र पसरू लागले आहे. ‘निर्माल्य इथे ठेवण्यात आलेल्या कलशामध्ये टाकावे,’ असे आवाहन करणारे फलक पालिकेने लावले होते. परंतु, फलकच आता कलशाची वाट पाहू लागले आहेत. नदीसुधारणेसाठी मोठे प्रकल्प राबविण्याच्या निव्वळ घोषणा करण्याऐवजी या छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.नागरिकांनी कलशात टाकलेल्या निर्माल्याचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी केला जाईल, असे स्पष्ट करून ते संकलित करण्यासाठी पूर्वी पालिकेकडून सातत्याने प्रयत्न होत होते. शाळा, महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात आली. परिणामी नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्याचे महत्त्व पटू लागले होते. निर्माल्य कलश ओसंडून वाहत होते. मात्र अचानक ठिकठिकाणचे निर्माल्य कलश गायब झाले आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेली स्वयंशिस्तीला पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बाधा येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडूनच हे कलश हलविण्यात आले की परस्पर कोणी उचलून नेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेकडून दरवर्षी कलशामध्ये संकलित होणारे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट आर्थिक तरतूद करण्यात येते. तरीही निर्माल्य कलशांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका