शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या सुधारणेला खीळ बसण्याचा धोका

By admin | Updated: April 2, 2015 05:51 IST

प्रशासन व व्यवस्थापनातील ढिलाईमुळे कोट्यावधी रुपयांच्या बोजाखाली अडकून खिळखिळ््या झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला सुधारणांच्या

पुणे : प्रशासन व व्यवस्थापनातील ढिलाईमुळे कोट्यावधी रुपयांच्या बोजाखाली अडकून खिळखिळ््या झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला सुधारणांच्या मार्गावर आणण्याचे काम डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले. मात्र केवळ साडे तीन महिन्यांत त्यांची बदली झाल्याने या सुधारणांना पुन्हा खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘पीएमपी’चे रुपडे पालटत असताना डॉ. परदेशी यांची बदली झाल्याने पीएमपीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.दररोज सुमारे बारा लाख प्रवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी पीएमपी बससेवा मागील काही वर्षांत कोलमडून गेली होती. ताफ्यातील एकुण बसपैकी ५० टक्के बसही दुरुस्तीअभावी मार्गावर येत नव्हत्या. त्यामुळे रोजचा आर्थिक तोटा वाढतच चालला होता. दिवसेंदिवस डबघाईला आलेल्या पीएमपीला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर महिन्यात डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारख्या कार्यक्षम आएएस अधिकाऱ्याची नेमणुक केली. त्यावेळी त्यांच्याकडे मुद्रांक शुल्क महानिरीक्षक पदाचा मुख्य भार होता. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. हे पद स्वीकारल्यापासून त्यांनी पीएमपीमध्ये सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली. मागील तीन महिन्यांत त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे पीएमपी आता कुठे मार्गावर ेयेवू लागली होती. परदेशी यांनी धडाकेबाज निर्णय घेत सर्व बसगाड्या रस्त्यांवर आणण्याचा निर्णय घेत त्या येत नाही तोवर वेतन रोखण्याचा निर्णय घेतला. कसलाही गाजावाजा न करता स्वत: बसने ़प्रवास करुन प्रवाशांना काय अडचणी येतात त्याचीही पाहणी केली. सुट्ट्या भागांसाठी रोजच्या उत्पन्नातील ६ टक्के हिस्सा राखुन ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय त्यांनी घेतला. तज्ज्ञ सल्लागारांची नेमणुक, वेळापत्रकामध्ये सुधारणा, कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी उगारलेला कारवाईचा बडगा, बसेसची रंगरंगोटी, नवीन फलक अशा अनेक सुधारणांचे काम त्यांनी हाती घेतले होते. त्यातून सकारात्मक बदलही जाणवत होते. पीएमपीच्या सुधारणेसाठी त्यांनी दीर्घकालीन कृती आराखडा तयार केला. मात्र आता त्यांची बदली झाल्याने सुधारणांना अडथळा होण्याची शक्यता आहे.