शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाना-नानी पार्क होत असेल तर 'कपल गार्डन' का नाही : राईट टू लव्ह संस्थेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 21:46 IST

म करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.  ‘प्रेम होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रेम आणि प्रेम करणा-यांचा सन्मान झाला पाहिजे. पुण्यात  ‘नाना नाना पार्क’ आहेत मग तशी ‘कपल्स गार्डन’ का असू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित करीत  प्रेमाचे समर्थन करणा-या ‘राईट टू लव्ह’ संस्थेने महापालिका आयुक्तांकडे काही गार्डंन्सकपल गार्डन्स’ म्हणून घोषित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे : प्रेम करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.  ‘प्रेम होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रेम आणि प्रेम करणा-यांचा सन्मान झाला पाहिजे. पुण्यात  ‘नाना नाना पार्क’ आहेत मग तशी ‘कपल्स गार्डन’ का असू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित करीत  प्रेमाचे समर्थन करणा-या ‘राईट टू लव्ह’ संस्थेने महापालिका आयुक्तांकडे काही गार्डंन्सकपल गार्डन्स’ म्हणून घोषित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसे न झाल्यास दि. 14 फेब्रुवारी  ‘व्हँलेंटाईन डे’च्या दिवशी महानगरपालिकेच्या विरोधात तीव आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.’प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

             आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना एकटेपणा जाणवत आहे. सर्व समाजावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. या परिस्थितीमध्ये  ‘प्रेम’ हेच यातून बाहेर येण्याचे नैसर्गिक औषध आहे. मात्र  सद्यस्थितीत प्रेमी युगलांना योग्य आणि सुरक्षित जागा नसल्यामुळे नद्यालगतचे रस्ते, झेड ब्रीज तसेच इतर पुलांचे कठडे, टेक्ड्या आदी ठिकाणी एकमेकांना भेटावे लागते. ब-याचदा संस्कृती रक्षकांकडून त्यांना मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. संध्याकाळच्या वेळेस मुलींचे विनयभंग होण्याचे प्रकार घडत आहेत. सिंबायोसिस टेकडी, पर्वती आदी ठिकाणी घडलेली लैंगिक अत्याचाराची प्रकरणेही ताजी आहेत. यातच प्रेम करणा-या जोडप्यांवर  ‘झेड ब्रीजवर’ थांबल्यामुळे कारवाई करण्यात येत होती, या गोष्टींकडे  ‘राईट टू लव्ह’ संस्थेने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

              पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरामध्ये सुरक्षित ठिकाण नसणे आणि त्यात संस्कृती रक्षकांबरोबरच पोलिसांनाही प्रेम करणा-या जोडप्यांना हुसकावून लावणे, त्यांच्यावर कारवाई करणे हा खरेतर अन्याय आहे. त्यामुळे प्रेमी युगलांसाठी ’कपल गार्डन’ असायला हवीत. प्रेम करणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार असल्यामुळे त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय तो उपभोगता आला पाहिजे या भूमिकेतून  महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारण 110 गार्डन्स आहेत. त्यातील काही गार्डंन्स दि. 14 फेब्रुवारी पूर्वी  ‘कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संस्थेने महापालिका आयुक्तांना दिले आहे.

अभिजित कांबळे, राईट टू लव्ह :’’ गेल्या वर्षीपासून पुण्यात  ‘कपल गार्डन’ असावीत अशी आम्ही मागणी करत आहोत. प्रेमी जोडप्यांना बोलण्यासाठी व्यक्त होण्यासाठी जागा नाही.हीकपल्स गार्डन झाल्यास  देशातील हा पहिला प्रयोग ठरेल. पुण्यातले इम्प्रेस गार्डन’ हे काही अधिकृत प्रेमींसाठीचे गार्डन नाही. ही कपल्स गार्डन्स कशी असावीत, नियम अटी काय असाव्यात याचा ड्राफ्ट आम्ही तयार केला आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आम्ही द्यायला तयार आहोत पण अजून आयुक्तांची वेळ मिळालेली नाही''. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट