शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:57 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा किमी 41/800 या ठिकाणी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा किमी 41/800 या ठिकाणी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. रविवारी पहाटे या ठिकाणी दरड कोसळली होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळत दगड व माती मार्गावर आल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.तीनच दिवसांपूर्वी रविवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती, त्यानंतर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरक्षेकरिता पत्रे लावत बंद करण्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नसली तरी द्रुतगती महामार्गावरील प्रवास पुन्हा धोकादायक ठरू लागला आहे. तीन वर्षांपूर्वी खंडाळा घाटातील आडोशी बोगदा व खंडाळा बोगदा परिसरात मोठय़ा प्रमाणात दरडी पडण्याच्या घटना घडल्या त्या यामध्ये काही प्रवासी व वाहनचालक मयत तसेच जखमी झाले होते.या घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने मोठय़ा प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सदर भागातील डोंगरांना सुरक्षा जाळीचे आच्छादन केले होते. सदर काम केलेल्या डोंगरा मधूनच आता पुन्हा एकदा दरड कोसळू लागल्याने या भागात देखिल सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी प्रवासी व वाहनचालक करु लागले आहेत.