शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

इंग्लंडच्या ६ तरुणांची कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:41 IST

लंडन येथील हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या  पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. 

ठळक मुद्देस्वराज्याची राजधानी राजगडला भेट : भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम

वेल्हे : पृथ्वीवरील वनसंपत्ती आणि पर्यावरणरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी आणि विश्वबंधुत्व, ऐक्य व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासारखी लंडन येथील ६ ध्येयवेड्या तरुणांनी भारतातील कोची ते जैसलमेर या दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन केले आहे. हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. वेल्हे तालुक्यातील स्वराज्याची राजधानी राजगड किल्ल्याला त्यांनी भेट दिली. यावेळी लोकमत प्रतिनिधीशी  त्यांची बातचीत झाली. जेत्रो क्रोक, बेल फ्यारी, सयाम स्नोड, रुफ्फ रेज्जास, जेस्स्य फ्योबेर्स, लेम पुलं हे लंडनमधील ६ युवक अनोख्या रिक्षा दौडमध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात कोची ते जैसलमेर असा ३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास वीस दिवसांत पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या मोहिमेतून हे निसर्गप्रेमी परदेशी युवक भारतीय संस्कृती व पश्चिम घाटातील नैसर्गिक विविधतेचा अभ्यास करत आहेत. भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. 

ब्रिटनमधील राजधानी लंडन येथील हे सहाही तरुण उच्चशिक्षित आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधता, सह्याद्री पर्वतरांग, निसर्गसौंदर्य यांचा अभ्यास करण्यासाठी व आस्वाद घेण्यासाठी वनजंगल वाचविण्यासाठी रिक्षादौड मोहीम केरळमधील कोची येथून सुरू केली. तसेच विश्वशांतीचा व बंधुत्वाचा संदेश या रिक्षा दौडमधून ते देत आहेत. हा लांब पल्ल्याचा प्रवास दोन रिक्षांमधून ते करत असून, रिक्षांच्या वर दुर्मिळ ह्यजग्वारह्ण प्राण्याची बसवलेली प्रतिकृती सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.वीस दिवसांत भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अंधार पडेल त्या खेडेगावात मुक्काम करणे, गावामधील ग्रामीण जेवण करणे, नदीवर अंघोळ असा नैसर्गिक प्रवास ते करत आहेत. 

.........................

भारतालील लोक अतिशय प्रेमळ असून यांना भेटून आम्हांला खूप आनंद झाला. येथील विविधतेतील एकता आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आम्हांला खूप आवडली. जागोजागी नागरिकांकडून सहकार्य व प्रेम मिळते याचे आम्हांला खूप आश्चर्य वाटते. भारत देश अतिशय निसर्गसंपन्न असून येथील निसर्ग आणि वन्यजीव टिकवण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रातील वेल्हे तालुक्यातील शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला आम्हांला खूप आवडला. या किल्ल्याची जागतिक वारसास्थळात नोंद असल्याने आम्ही तो आवर्जून पाहिला.    बेल फ्यारी, लंडन पर्यटक, रिक्षा दौड. 

टॅग्स :PuneपुणेEnglandइंग्लंडJaguarजॅग्वार