शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 20:39 IST

गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.  त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही.

पुणे, दि. 21 - गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.  त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. या बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) नेमण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सहकार विभागाला दिले आहेत. बँकेच्या विलिनीकरणाबाबत मुंबईतील एका सहकारी बँकेचा प्रस्ताव बँकेला आला आहे. 

लोकसेवा सहकारी बँकेचे अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण वाढल्यामुळे २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लागू केले होते. मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे हे या बँकेचे संस्थापक आहेत. त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक स्थैर्यता आणि भांडवल उभारणीसाठी बँकेने कोणतेही प्रयत्न न करणे, ठेवीदारांना व्याजासह त्यांच्या ठेवी परत देण्याबाबत अहवाल सादर न करणे, तसेच बँकेच्या पुनरुज्जीवनाला संधी नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने सांगूनही लोकसेवा बँकेकडून भांडवल उभारणी आणि आर्थिक पुनबांधणीसाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली गेली नसल्याने तसेच बँकेच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न केले गेले नसल्याची बाबही आदेशात नमूद केली आहे. 

बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असला तरी विलिनीकरणाचा पर्याय आहे. त्यासाठी मुंबईतील एका सहकारी बँकेचा प्रस्ताव आहे. यासंबधी बँकांच्या टाक्स फोर्सची ८ व १३ सप्टेंबरच्या बैठका होऊ शकल्या  नाहीत. २० सप्टेंबरची बैठक पावसामुळे पुढे ढकलली गेली आहे. ती येत्या २ -३ दिवसात होईल. त्यात बँकेच्या विलिनीकरणासंबंधी चर्चा होईल, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. 

एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याने त्या ठेवी ठेवीदारांना परत दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत बँकेने १ लाख रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या १३ हजार ५०० ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या असून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या ठेवी असलेले २ हजार ३०० ठेवीदार असल्याचे त्यांनी सांगितले.