शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लष्करातून निवृत्त कर्नलची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 18, 2023 17:47 IST

लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. 

पुणे : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देउन लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते वाघोली परिसरात राहायला आहेत. त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ आला. तो कॉल उचलल्यावर त्यावेळी समोर एक तरुणी कपडे काढत होती. फिर्यादी यांनी व्हिडीओ कॉल लगेच ठेवला. मात्र सायबर चोरट्याने तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना पैशाची मागणी केली.

पैसे देण्यास नकार दिल्यावर सायबर चोरट्याने वेगळ्या क्रमांकावरून फोन करून दिल्ली पोलीस मधून बोलत असल्याचे सांगितले. व्हिडीओ आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर व्हायरल झाला तर खूप बदनामी होईल त्यामुळे तत्काळ ते व्हिडिओ डिलीट करून घ्या असे सांगितले. व्हिडीओ डिलिट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख ७४ हजार २३२ रुपये ट्रान्स्फर करायला भाग पडले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणे