पुणे : चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना विद्यापीठ परिसरात घडली. सोमवारी पहाटे सिद्धी विनायक स्नॅक्स सेंटर येथे घडलेल्या या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा नोंदविला.अख्तर इम्तियाज खान (२२, रा. इंदिरानगर वसाहत, औंध) असे खून झालेल्याचे, तर करीम कादर सय्यद (रा. इंदिरानगर वसाहत, बाणेर) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी अमजद नदाफ (३०, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नदाफ हे करीम आणि अख्तर यांच्याबरोबर स्नॅक्स सेंटर येथे चहा आणि पोहे खात होते. अख्तर याचा एका व्यक्तीला चहा पिताना धक्का लागला. यावरून अनोळखी व्यक्तीने अख्तर याच्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी मध्यस्थी करणाºया करीम याच्यावरही हल्ला करण्यात आला.
धक्का लागला म्हणून युवकाची हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:31 IST