शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘नाटा’चा निकाल वादाच्या भोवऱ्यात, अनेकांनी घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:45 IST

देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे.

पुणे : देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे. निकाल जाहीर करण्यापासून ते विद्यार्थ्यांना रेखाचित्र (ड्रॉर्इंग) विषयात मिळालेल्या कमी गुणांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काही विद्यार्थ्यांना तर शून्य गुण मिळाले आहेत. यावर वास्तुशास्त्र परिषदेच्या काही सदस्यांनीही नाराजी व्यक्तकेली आहे.मागील काही वर्षांपासून देशातील वास्तुशास्त्र महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा दि.२९ एप्रिल रोजी झाली. या परीक्षेला देशभरातून ४९ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकूण ३० हजार ५६० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतिम निकाल ‘नाटा’ संकेतस्थळावर दि.६ जून रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी तीन वेळा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्यांदा दि. १७ मे रोजी गणित व सामान्य बुद्धिमत्ता पेपरचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दोन काही प्रश्नांवर हरकती आल्याने पुन्हा सुधारित निकाल दि. २४ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर दि.४ जून रोजी रेखाचित्र पेपरचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला.या निकालानंतर अनेक विद्यार्थी व पालकांना धक्का बसला. काही विद्यार्थ्यांना रेखाचित्र पेपरला शून्य गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी परिषदेकडे तक्रारी करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. बुधवारी (दि.६) परिषदेने अंतिम निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय कला प्रसारणी सभेच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्कर कानविंदे म्हणाले, ‘काही विद्यार्थ्यांच्या शून्य गुण मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनी या पेपर सोडविला असेल तर त्यांना शून्य गुण मिळू शकत नाहीत.’ काही पालकांनीही कानविंदे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘रेखाचित्र या पेपरला शून्य गुण मिळणे बुद्धिला पटत नाही. तसेच माझ्या मुलीलाही अपेक्षेपेक्षा ३० गुण कमी मिळाले आहेत. त्यामुळे या परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते,’ असे एका पालकांनी सांगितले.पहिल्यांदाच एवढा गोंधळमागील आठ वर्षांपासून परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच असा गोंधळ झाला आहे, अशी नाराजी परिषदेतील एका सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शून्य गुण मिळणे हा खूप गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे परिषदेने याबाबत तातडीने समिती स्थापन करून चौकशीचा निर्णय घ्यायला हवा. याबाबत परिषदेने बैठक बोलवावी. त्यामध्ये हा मुद्दा उचलून धरू, असेही संबंधित सदस्याने स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे