शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खटल्यांच्या थेट प्रक्षेपणाचा निकाल : वकिलांकडून निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 02:40 IST

न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांची न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तयारी दर्शवली आहे.

पुणे - न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांची न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तयारी दर्शवली आहे; मात्र संवेदनशील प्रकरणे सोडून इतर खटल्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याची सुरुवात सर्वोच्च न्यायालयातूनच होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे शहरातील वकिलांनी स्वागत केले आहे. त्यामुळे कामकाजाची पारदर्शकता वाढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.देशाचे लक्ष असलेल्या खटल्यांची सुनावणी नेमकी कशाप्रकारे होते, याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल असते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांनादेखील सर्व कामकाज पाहता येऊ शकते. आपल्या कायद्यात ओपन ट्रायलची तरतूददेखील आहे. वकील आरोपींची उलटतपासणी कशी घेतात, निकाल देताना कोणत्या बाबींचा विचार करण्यात आला हे सर्व मुद्दे थेट प्रक्षेपणातून समजू शकेल व कामकाजात पारदर्शकता राहील.- अ‍ॅड. हर्षद निंबाळकर,माजी अध्यक्ष, बार कौन्सिलआॅफ महाराष्ट्र आणि गोवासर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजातील पारदर्शकता वाढणार आहे. त्यामुळे ही बाब नक्कीच परिणामकारक राहील. खटल्याच्या सुनावणीसाठी तारीख कोणती द्यायची, यावरून गोंधळ होतो. मात्र, सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने न्यायालयीन कामकाजाच्या शिस्तीत वाढ होईल. मुळात हा निर्णय फार आधी होणे गरजेचे होते. - अ‍ॅड. भास्करराव आव्हाड,माजी अध्यक्ष, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवासध्या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात देखील अद्ययावत सामग्रीचा वापर करणे गरेचेचे आहे. खटल्याचे थेट प्रक्षेपण झाल्यास नागरिकांना देखील कामकाजाची माहितीहोईल. त्यातून त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल. लोकांची आजही धारणा आहेकी, न्यायालयाचे कामकाजसिनेमात दाखविल्यांप्रमाणेच चालते.- अ‍ॅड. प्रताप परदेशी, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशनबलात्कार, विनयभंग यासारखी प्रकरणे सोडली तर, इतर खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास हरकत नाही. त्यामुळे हा अत्यंत चांगला निर्णय आहे. त्यातून न्यायव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तर थेट प्रक्षेपण होणार असल्याने या यंत्रणेत काम करीत असलेल्या व्यक्तींनादेखील खटल्याचे गांर्भीय जाणवेल व त्यानुसार निकाल लागू शकतील.- अ‍ॅड. गिरीश शेडगे,माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या