बारामती : बारामती शहराचा विकास होत आहे. शहराचे सौंदर्य वाढवण्याची जबाबदारी फक्त कर्मचारी, सफाई कामगारांची नाही, शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.कामगारदिनानिमित्त बारामती नगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पवार बोलत होते. या वेळी आरोग्य विभागाच्या १२० कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला.या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, कमरूद्दीन सय्यद,किशोर भापकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:11 IST