शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

कर्तबगार सखींचा सन्मान

By admin | Updated: November 26, 2015 00:40 IST

राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ‘चूल आणि मूल’ या आयुष्याच्या पारंपरिक चौकटीला छेद देत

पुणे : राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ‘चूल आणि मूल’ या आयुष्याच्या पारंपरिक चौकटीला छेद देत तिने यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. आपल्या कर्तबगारीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सखींना ‘लोकमत’च्या वतीने ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन मानाचा मुजरा करण्यात आला.‘लोकमत’तर्फे आयोजित वूमन समिटमध्ये या कौतुक सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसिद्ध लेखक चेतन भगत, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यावेळी उपस्थित होते.जिवाचे रान करून घर आणि दार सांभाळणाऱ्या महिलांच्या कष्ट उपसण्याची जिद्दीला, चिकाटीला आणि कर्तबगारीला सलाम करण्यासाठी ^लोकमतच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. निष्ठेने आणि निरपेक्षपणे काम करणा-या महिलांचे कार्य उजेडात येऊन उत्तम कार्याचा गौरव व्हावा, हा यामागचा हेतू आहे.या परिषदेमध्ये सामाजिक, क्रीडा, शौर्य, शिक्षण, उद्योग व व्यवसाय, कला व साहित्य, आरोग्य या क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांना पुरस्कृत करण्यात आले. यंदाच्या वर्षी क्रीडा क्षेत्रासाठी रायफल शूटिंगमध्ये अग्रेसर असलेल्या पूजा घाटकर, सामाजिक क्षेत्रासाठी ‘खेळघर’च्या शुभदा जोशी, शौर्य विभागासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे, शिक्षण क्षेत्रात रजनी परांजपे, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात शुभांगी गोळे, कला आणि साहित्य क्षेत्रासाठी पर्ण पेठे, आरोग्य क्षेत्रात डॉ. वैशाली जाधव यांना ‘लोकमत सखी सन्मान २०१५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर कामगार चळवळीत तळमळीने उभ्या राहणाऱ्या मुक्ता मनोहर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाळयांच्या कडकडाटात सभागृहाने त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.महिला सक्षमीकरणाच्या बळकटीसाठी परिसंवाद आणि हे सक्षमीकरण सिद्ध करणाऱ्या सखी, असा ‘दुग्धशर्करा’ योग या पुरस्कारांच्या निमित्ताने पहायला मिळाला. या पुरस्कारार्थी म्हणजे आमच्यासाठी ‘आयडॉल’ आहेत आणि त्यांचे कार्य, कामगिरी जाणून आम्हाला प्रोत्साहन मिळाने, अशी भावना अनेक तरुणी, महिलांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)