शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात आरक्षणे बदलली

By admin | Updated: June 10, 2017 01:54 IST

खेड तालुक्यातील १३९ रिक्त पोलीस पाटलांचे ११४ गावांचे फेरआरक्षण आज पुन्हा काढण्यात आले. यात अनुसूचित जाती

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : खेड तालुक्यातील १३९ रिक्त पोलीस पाटलांचे ११४ गावांचे फेरआरक्षण आज पुन्हा काढण्यात आले. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (ब) हे आरक्षण आहे तसेच ठेवून उर्वरित प्रवर्गांची फेरआरक्षण सोडत काढण्यात आली.तीन दिवसांपूर्वी पोलीस पाटलांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, दि. ८ रोजी पुन्हा आरक्षणे बदलली. २००८च्या आदेशाप्रमाणे ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागास प्रवर्ग व खुला वर्ग अशा क्रमाने काढणे आवश्यक होते. मात्र, हे आरक्षण बिंदुप्रणालीनुसार काढल्याने त्यात पुन्हा तांत्रिक बदल करून फेरआरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी उपविभागीय आधिकारी सुनील गाढे, प्रभारी तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, अमर कांबळे, ज्योती अरगडे, पोलीस पाटील संघटनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.अनुसूचित जाती : धुवोली, येणिये खुर्द (महिला), येलवाडी, खराबवाडी, येणिये बुद्रुक, पिंपळगावतर्फे चाकण, कडाचीवाडी (महिला), विऱ्हाम, कुरुळी (महिला), पांगरी. अनुसूचित जमाती (अनुसूचित जमाती) : तोरणे खुर्द, पाभे, भिवेगाव, धामणगाव खुर्द (महिला), धामणगाव बुद्रुक, नायफड, एकलहरे, खरपूड (महिला), मोरोशी, भोमाळे (महिला), टोकावडे (महिला), कोयाळीतर्फे वाडा. विशेष मागास प्रवर्ग : कान्हेवाडी बुद्रुक, चांडोली, मेदनकरवाडी, गोलेगाव (महिला). विमुक्त जाती (अ) : कन्हेरसर, वाकी खुर्द, चिंचोशी (महिला), सिद्धेगव्हाण (महिला), रोहकल. भटक्या जमाती (ब) : कुरकुंडी, कोहिंडे बुद्रुक औदर (महिला). भटक्या जमाती (क) : कोयाळीतर्फे चाकण (महिला), कडूस, चऱ्होली खुर्द, आंबोली (महिला), नाणेकरवाडी, वाजवणे. भटक्या जमाती (ड) : शिंदे, भांबोली, कोरेगाव बुद्रुक, बुट्टेवाडी (महिला). इतर मागासप्रवर्ग : कान्हेवाडी खुर्द, शिरगाव, गारगोटवाडी, वरुडे, पूर, सुरकुंडी (महिला), चिंबळी, बहिरवाडी, शेलगाव (महिला), चास (महिला), निघोजे, शिवे, काळूस, भोरगिरी (महिला), शेंदुर्ली, पाडळी, वडगाव घेनद, आसखेड खुर्द (महिला), डेहणे, मोहकल, महाळुंगे, धामणे, वाळद (महिला), जऊळके खुर्द (महिला), सातकरस्थळ, आखरवाडी, मंदोशी (महिला), आढे, बुरसेवाडी (महिला), कमान.सर्वसाधारण आरक्षण : देशमुखवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, आभू, बिरदवडी, दावडी, करंजविहीरे, तिफनवाडी, वाकीतर्फे वाडा, आंबेठाण, कोळीये, वासुली, केळगाव, वाघू, सांगुर्डी (महिला), हेंदृज (महिला), पाळू, तळवडे, सावरदरी, पिंपरी खुर्द, सुपे, दरकवाडी, टेकवडी (महिला), कोहिंडे खुर्द, जैदवाडी (महिला), कहू (महिला), साबुर्डी, वाशेरे, कोरेगाव खुर्द (महिला), राक्षेवाडी, वांद्रा, कारकुडी, आसखेड बुद्रुक, परसूल (महिला), साकुर्डी, घोटवडी (महिला), आव्हाट, गुंडाळवाडी, औंढे (खुला गर्व) : गाडकवाडी (महिला), चिंचबाईवाडी, पराळे (महिला), आरुडेवाडी (महिला), काळेचीवाडी (महिला), ढोरेवाडी, किवळे (महिला), खालची भांबुरवाडी (महिला), कोहिणकरवाडी, टाकळकरवाडी, पाचारणेवाडी, मांजरेवाडी, साबळेवाडी, वरची भांबुरवाडी, पापळवाडी, सांडभोरवाडी, कासारी, गुळाणी, संतोषनगर, तोरणे बुद्रुक (महिला), आडगाव, होलेवाडी, भलवडी (महिला), बहूळ, मिरजेवाडी (महिला), अनावळे (महिला) अहिरे (महिला).