शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीओपी’च्या पुनर्वापरासाठी तंत्रज्ञान विकसित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:20 IST

विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानीकारक ठरलेल्या ^‘प्लास्टर आॅफ पॅरिस’चा (पीओपी) पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

पुणे : विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानीकारक ठरलेल्या ^‘प्लास्टर आॅफ पॅरिस’चा (पीओपी) पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. वापरलेल्या ‘पीओपी’वर सोप्या पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेल्या ‘पीओपी’चा वापरही पूर्वीप्रमाणेच करता येत असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.घरगुती सजावट, भव्य देखावे, मूर्ती तयार करण्यासाठी दररोज हजारो टन पीओपीचा त्यासाठी वापर केला जातो; पण एकदा वापरलेल्या ‘पीओपी’चा पुन्हा वापर करता येत नसल्याने त्याचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही प्रचंड आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सायन्स पार्क विभागाने यावर संशोधन करून नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. याविषयी डॉ. जयंत गाडगीळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गाडगीळ यांच्यासह त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के यांनी यावर संशोधन केले आहे.गणेश मंडळे, संस्थांशी बोलणार‘पीओपी’चा पुनर्वापर करता येत असल्याने ही बाब संशोधनापुरती मर्यादित न राहता ते व्यापक स्वरूपात प्रत्यक्षात यायला हवे. त्यासाठी संस्था, गणेश मंडळांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाकडून पालिका प्रशासन, गणेश मंडळांशी चर्चा केली जाईल. पीओपीच्या पुनर्वापरासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, असे डॉ. जयंत गाडगीळ यांनी सांगितले.पुण्यात पीओपीपासून बनविण्यात आलेल्या किमान सहा लाख मूर्तींचे मागील वर्षी विसर्जन झाले. महाराष्ट्रात तर ही संख्या कितीतरी पट आहे. यामुळेच गणपती उत्सवाचे वेध लागले की, त्या बरोबरच पीओपीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे काय करायचे, असा सूरही उमटतो. कारण, पीओपी किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आत्तापर्यंत मानण्यात आले होते.हीच बाब घरात व समारंभांमध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणाºया पीओपीलाही लागू पडते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन अत्यंत उल्लेखनीय आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ