पेरणे येथे ग्रामपंचायत इमारतीचे मुख्य ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत शिक्षक मधुकर वाळके पाटील यांना देण्यात आला, अध्यक्षस्थानी सरपंच रुपेश ठोंबरे होते. राधाकृष्ण विद्यालयचे ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब कदम व जिल्हा परिषद शाळा पेरणे येथे महिला सदस्याच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण झाले.
सहकार सोसायटी अध्यक्ष दत्ताआबा वाळके, शिवाजी वाळके, रवींद्र वाळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. फुलगाव येथील ग्रामपंचायतीचे मुख्य ध्वजारोहण सरपंच मंदाकाकी साकारे यांच्या हस्ते झाले. हरी उध्दव धोत्रे माध्यमिक विद्यालय ' धोत्रे प्राथमिक शाळा येथे संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे आणि मान्यवराच्या हस्ते झेंडावंदन झाले. या वेळी उपसरपंच उज्वला खुळे, माजी सरपंच सुनील वागस्कर, नारायणराव खुळे, नामदेव वागस्कर, आशोक वागस्कर, कांताराम वागस्कर, भानुदास साकोरे, राहुल वागस्कर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक शरद वाखारे व राजाराम भिलारे यांनी स्वागत व प्रास्तविक केले.
श्री क्षेत्र तुळापूर येथे मुख्य झेंडावंदन झाले.धर्मवीर संभाजी महाराज माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा येथेही ध्वजारोहण झाले. यावेळी माजी सरपंच रुपेश शिवले, राहुल राऊत, गणेश पुजारी, अमोल शिवले, संतोष शिवले, संजय चव्हाण आणि सर्व नवनिर्वाचीत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वढु खुर्द येथे प्रजासत्ताक दिनाचे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांनी संयुक्त नियोजन केले होते. माजी सरपंच ज्ञानेश्वर चोंधे, नव निर्वाचित सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
लोणीकंद येथे ग्रामपंचायत मुख्य इमारती मध्ये आणि डॉ. बसू विद्याधाम, जिल्हा परिषद शाळा लोणीकंद याचे मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम झाला. सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच शीतल कंद, योगेश झुरुंगे, रवींद्र कंद, सोहम शिंदे , योगेश शिंदे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देण्यात आला.
--
पेरणे फाटा येथील चंद्रप्रकाश धोका निवासी कर्णबधिर विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महालक्ष्मी बचतगट पेरणे फाटा अध्यक्ष गजानन मंगळे, दोडेवार अनिल बांडेबुचे.
संतोष गोरे यांच्या हस्ते महात्मा गांधी. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले .संस्थेचे अध्यक्ष सुभाष कट्यारमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व नंतर संविधान वाचन करण्यात आले मुख्याध्यापक रमेश घोडेराव यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले. आज विद्यालयामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थी नसल्याने किलबिलाट नव्हता, गोंधळ नव्हता, तरी याची रुखरुख उपस्थित मध्ये दिसत होती .डोंगरगाव व बुर्केगाव येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व खाऊ वाटप करण्यात आले.
--
२७ लोणीकंद फुलगाव
फोटो क्रमांक : २७ लोणीकंद फुलगाव
फोटो ओळी- फुलगाव (ता. हवेली) येथे सरपंच मंदाकाकी साकोरे यांनी ध्वजारोहण केले यावेळी उपसरपंच उज्वला खुळे व इतर सहकारी
छाया के. डी. गव्हाणे