शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

By admin | Updated: April 12, 2015 00:27 IST

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून सध्या टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगालाच ही आग लागली. त्यामुळे दोन दिवसांपासून तब्बल दीड हजार टन कचरा शहरातच साठवून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगीमुळे उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा गाड्या डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरात दररोज किमान पंधराशे ते सोळाशे टन मिश्र कचरा तयार होतो. पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, या कचऱ्यातील केवळ ५०० टन सुका कचरा डेपोवर टाकला जातो. तर उर्वरित कचरा शेतकऱ्यांना देऊन काही कचरा शहरातच जिरवला जातो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटली असतानाच गुरुवारी या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग आणखी भडकली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून ज्या ठिकाणी ५०० टन सुका कचरा कँपिंगसाठी घेतला जात होता, त्याच ठिकाणी आग लागल्याने ती आटोक्यात येईपर्यंत एकही गाडी डेपोवर पाठविणे पालिकेस शक्य नाही. त्यामुळे गुरुवारपासून एकही गाडी पालिकेकडून डेपोवर पाठविली नसल्याने सुक्या कचऱ्याची समस्या शहरात निर्माण झाली आहे.ग्रामस्थ आक्रमक ४आगीमुळे कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे डेपोवर एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरही ग्रामस्थांनी ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.४कचरा डेपोवरील आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा तीन दिवसांपासून २४ तास कार्यरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकत आहे. त्यातच काही दिवसांपासून शहरासह उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या परिसरात जोराचा पाऊस झाल्यास आगीवर नियंत्रण मिळण्यास प्रशासनास मदत होणार आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे डेपोवर गाड्या पाठविणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कचरा शहरातच पडून आहे.- सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख