विशाल शिर्के, पुणेराष्ट्रीय बँक... इन्शुरन्स व्यवसाय करणारी नामांकित कंपनी.. हॉटेल...केबल व्यावसायिक... व्यवसायासाठी भाडे करारावर दिलेल्या गाळेधारकांकडे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. अगदी काही महिन्यांपासून ते तब्बल बारा वर्षे थकबाकीदार असलेल्या भाडेकरूंचादेखील यात समावेश आहे. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक मालमत्ता भाडेकरारावर दिलेल्या आहेत. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळावे, ही अपेक्षा आहे; मात्र अनेक भाडेकरूंकडून भाड्याची वसुलीच होत नसल्याचे ‘माहिती अधिकारा’त समोर आले आहे. विशेष म्हणजे, हाती आलेली माहिती ही केवळ घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर भागातील गाळ्यांची आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा कितीतरी अधिक असल्याची शक्यता आहे.
भाड्याची रक्कमच ‘गाळ्यात’
By admin | Updated: April 27, 2015 05:00 IST