शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चाकण ते वासुली फाट्याच्या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:31 IST

चाकण ते वासुली फाटा यादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

आंबेठाण : चाकण ते वासुली फाटा यादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु येत्या काही महिन्यांतच या रस्त्याचे राज्य शासनाच्या अ‍ॅन्युटी कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे बांधकाम विभागाचे संतोष पवार यांनी सांगितले.

चाकण ते वासुली फाट्यावरील १२ किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक लहान-मोठे कारखाने असल्याने वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. परिणामी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वर्दळीच्या मानाने अरुंद आणि खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक वेळा नागरिकांनी रस्ता दुरुस्ती मागणी करून आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु आता हा रस्ता लवकरच होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संतोष पवार म्हणाले की, अ‍ॅन्युटी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील वासुली फाटा ते चाकणचा आंबेठाण चौकपर्यंत, निघोजे-मोई-चिंबळी फाट्यापर्यंत हा रस्ता आणि मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे ते खेड तालुक्यातील करंजविहिरे ते आसखेड फाटा असे तीन रस्ते दुरुस्त केले जाणार आहे. वासुली फाटा ते चाकण हा रस्ता १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिटीकरण केला जाणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. या रस्ता दुरुस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे संपादन केले जाणार नाही. चाकण नगर परिषद हद्दीत नगर परिषदेच्या मदतीने तर अन्य ठिकाणी स्वत: बांधकाम विभाग आवश्यक तेथे अतिक्रमण काढणार आहे.चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन यांना जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून चाकण वासुली फाटा रस्ता ओळखला जातो. परंतु सध्या या मार्गावर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे वाहनचालकांना समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मुळातच रस्ता अरुंद असल्याने व पुन्हा रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याने अपघात घडण्याचे धोके वाढत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने पायी चालणाºयांसह दुचाकीस्वार, महिला व दुचाकीचालकांना तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकण