शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

घोडेगाव तहसीलमध्ये ग्राहक दिन कार्यक्रम रद्द, तहसीलदारांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:51 IST

घोडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (दि. २६) अचानक आयोजिलेला राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम जनतेला समजलेला नाही व त्यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत.

घोडेगाव : घोडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (दि. २६) अचानक आयोजिलेला राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम जनतेला समजलेला नाही व त्यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. असे करून तहसील कार्यालयाने राष्ट्रीय ग्राहक दिनाची हेटाळणी केली आहे, असा आरोप करीत आजचा हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी केली. कार्यकर्त्यांची नाराजी पाहून तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी माफी मागितली व दि. २९ रोजी हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याचे जाहीर केले.२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात हा ग्राहक दिन साजरा करण्याची जबाबदारी तहसील विभाग व ग्राहक पंचायतीच्या संघटनांची असते. यांनी एकत्र येऊन तारीख निश्चित करावी व तालुक्यातील जनतेला समजेल अशी जाहिरात करून ग्राहक दिनाला येण्याचे अवाहन करणे अपेक्षित असते. ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात जनतेचे प्रश्न शासकीय अधिकाऱ्यांनी सोडवायचे असतात.या वेळी ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, सुभाष मावकर, अजित इंदोरे, देविदास काळे, दगडू लोखंडे, गणेश पाटील, वैभव वायाळ, अमोल वायाळ, अशोक भोर, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष हरीश कानसकर, आंबेगाव तालुकाध्यक्ष नवनाथ थोरात आदी उपस्थित होते.कार्यकर्त्यांची नाराजी पाहून तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी माफी मागितली व शनिवारी (दि. २९) पूर्ण तयारी करून तहसील कार्यालयाच्या मोकळ्या आवारात पुन्हा हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. तसेच, दि. २७ रोजी अवसरी व दि. २८ रोजी वळती येथे ग्राहक पंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शासकीय यंत्रणा हजर राहील, असे त्यांनी सांगितले.आंबेगाव तालुका तहसील विभागाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पत्र दिले, फोन केले, मेसेज पाठविले; परंतु या कार्यक्रमाकडे तहसील विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कुठलेही पत्रक छापले नाही, कार्यक्रमाची तयारी केली नाही, कुणाला कळविले नाही, ऐन वेळी रात्री दहा वाजता मेसेज टाकून उद्या सकाळी कार्यक्रम असल्याचे कळविले जाते.अचानक आयोजित केलेल्या कार्यक्रमाची तालुक्यातील जनतेला माहिती झाली नाही. आजच्या कार्यक्रमाची साधी कार्यक्रम पत्रिकासुद्धा तहसील कार्यालयाला दाखवता आली नाही. हे सर्व पाहता, राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाची तहसील कार्यालयाकडून हेटाळणी झाली आहे. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे नितीन मिंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे