शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

विनयभंगप्रकरणी १५ दिवसात दिला निकाल

By admin | Updated: January 25, 2017 01:26 IST

विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसातच निकाल, देवून इंदापूर न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा साधा कारावा

इंदापूर : विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसातच निकाल, देवून इंदापूर न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा साधा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भानुदास एकनाथ मेंगावडे ( रा.राजेगाव, ता. दौंड ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता. इंदापूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. सोनवणे यांनी हा निकाल दिला.राजेगाव येथील मजूरी करणारी ही महिला (दि.८) रोजी सायंकाळी पाच वाजता भिगवण (ता. इंदापूर) येथे बाजार करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याच गावच्या भानुदास मेगावडेने तिच्याजवळ जावून,तिच्या अंगास हात लावला. तसेच, माझ्याबरोबर चल असे म्हणत आरोपीने तिला ओढले. ती त्यास सोड म्हणत असताना तिचे नातेवाईक हे घटनास्थळी आले. त्यांनी काय झाले म्हणून विचारले असता विवाहितेने घडलेली घटना सांगितली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. त्यानंतर दोघेही घरी आले. विवाहितेने घडलेला प्रकार भावास सांगितला. त्यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भानुदास पवार, मदतनीस पोलीस नाईक राजू ठोंबरे यांनी तपास करून इंदापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यात फियार्दीतर्फे सरकारी वकिल अ‍ॅड. अमर लोहकरे यांनी काम पाहिले. न्यायाधीश सोनवणे यांनी आरोपी भानूदास मेगावडे यास एक वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंडाची, तो न भरल्यास आणखी १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यापासून १५ दिवसातच झटपट निकाल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.