शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिका-यांचा सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:19 IST

सलग तीन महिने विरोधकांकडून जलवाहिन्या बदलण्याच्या निविदांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी या निविदा रद्द झाल्यामुळे गुरुवारी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुणे : सलग तीन महिने विरोधकांकडून जलवाहिन्या बदलण्याच्या निविदांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी या निविदा रद्द झाल्यामुळे गुरुवारी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेची माहिती घेण्यात आली, त्यानुसार जीएसटीमुळे दरांमध्ये फरक पडणार असल्याने निविदा रद्द करण्यात आल्या, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.आयुक्त कुणाल कुमार यांनी या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच महापौर टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या, देशातजीएसटी ही नवी कर प्रणाली सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या निविदांचा प्रशासनाने अभ्यास केला. त्यात कामाच्या साहित्याच्या दरात बराच फरक पडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या निविदा रद्दकरून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आहे का, यावर बोलताना सभागृह नेते भिमाले यांनी ही सगळी निविदा प्रक्रिया प्रशासकीय स्तरावरच झाली असल्याचे स्पष्ट केले. यात पदाधिकाºयांचा कुठेही हस्तक्षेप नव्हता. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्वच कामांच्या निविदांचा अभ्यास करत आहे. तसाच याही निविदेचा झाला. त्यात महापालिकेचे नुकसान होत आहे, असे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी ती माहिती देण्यात आली. त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक स्तरावरच प्रशासनाला निविदा रद्द करायला सांगण्यात आले, असे भिमाले यांनी सांगितले.विरोधकांच्या आरोपांनी दबून जाऊन निविदा रद्द करण्यात आली का, यावर स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी नकार दिला. विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते. स्थायी समितीकडे निविदा आल्यानंतरच पदाधिकाºयांचा रोल सुरू होतो. त्यापूर्वी सर्व माहिती प्रशासनालाच असते.पदाधिकाºयांना ती मागवून घेण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर महापालिकेचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निविदा रद्द करायला लावण्यात आल्या.