शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:31 IST

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देपाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसाननदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे

आंबेठाण : भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसान झाले. तर नदीला पाणी आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.भामा आसखेड धरणातून मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजांतून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून पाणी सोडण्याचा वेग वाढवून तो ९५० करण्यात आला. त्यामुळे नदीपात्र भरून वाहत होते. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे दुसरे आवर्तन असून दहा दिवस चालणार आहे.पाणी सोडण्याअगोदार दोन ते तीन तास पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, असे पिंपरी खुर्द आणि गोनवडी गावच्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र अचानक नदीतील पाणीत वाढ झाल्याने विजपंप नदीपात्रातून वर काढता आले नाही. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे विजपंप चालू होते. त्यामुळे  विजपंपात पाणी गेल्याने विजपंप जळून गेले आहेत. त्यामुळे नदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यासाठी एक व चार नंबरचे दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरुवात करण्याआगोदर धरणातील पाणीसाठा ८४.११ टक्के होता. तर पाणी पातळी ६६९.१६ मीटर इतकी होती. आजपर्यंत धरण परिसरात १२९२ मिली पावसाची नोंद झाली आहे.सध्याच्या दुसऱ्या आवर्तनात भीमा आणि भामा नदीवरील एकूण असणारे १८ बंधारे भरले जाणार आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड तालुक्यातील करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, वराळे, सावरदरी, कुरकुंडी, धामणे, कोये, किवळे, चांदूस, पिंपरी ब्रुदुक, रोहकल, भाम, गोणवडी, बोरदरा, पिंपरी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी ब्रुदुक, काळुस, भोसे व शेलगाव अशा अनेक गावातील शेतीपिकांना व गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडण्यात आल्याने भामानदी काठावरील गावच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Puneपुणे