शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बारे खुर्द ग्रामपंचायतीत १२ लाख ६८ हजारांचा आर्थिक अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:29 IST

उपोषणाचा इशारा : तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांच्याविरोधात ग्रामस्थांची तक्रार

भोर : भोर तालुक्यातील बारे खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी शासनाच्या फंडातील अंगणवाडी इमारत स्मशानभूमी, व्यासपीठ बांधणे, रस्ता करणे, तर १४ वा वित्त आयोग अशा विविध कामांत दोघांनी संगनमताने सुमारे १०३ बेअरर चेक काढून, दप्तर गायब करून व्हाऊचर मोजमापे, एम. बी. बुक नसून सुमारे १२ लाख ६८ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

याप्रकरणी तपासणी करून प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला असून यात तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी सरपंच परशुराम खुटवड, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ भालेराव, एकनाथ बदक, रामचंद्र नाना खुटवड व ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे.ग्रामस्थांनी सांगितले, की सन २०१३ ते २०१७ या कालावधीत सुनीता गोविंद बदक या सरपंच व अभिषेक विठ्ठल बोत्रे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामस्थांनी १८ आॅगस्ट २०१८ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. मात्र मागीलदोन-तीन महिन्यांत टाळाटाळकरीत काहीच कार्यवाही झालीनाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकारी सूरजमांढरे व पालकमंत्री गिरीशबापट यांच्याकडे ग्रामस्थांनी आॅक्टोबरमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर कारवाईला वेगाने सुरुवात झाली.बारे खुर्द ग्रामपंचायतीला २०१३ ते २०१७ कालावधीत विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळाला होता. त्यात अंगणवाडी इमारतीला सहा लाख रुपये आले होते. मात्र इमारत न बांधताच परस्पर निधी खर्च केला होता.स्मशानभूमीला ३ लाख रुपये निधी मंजूर होता. परंतु निकषाप्रमाणे काम न करताच रकमेचा अपहार केला. गौतमनगरमधील व्यासपीठासाठी ७५ हजार रुपयांचा निधी मिळाला; मात्र फरशी बसविण्यासाठी खर्च केला. रस्त्याच्या कामासाठी ३ लाख मंजूर होते; मात्र निकृष्ट काम करून अडीच लाखच खर्च केले.सभामंडपासाठी दोन लाख ६० हजार रुपये आले होते. मात्र त्याच्या खर्चाचा तपशीलच नाही. १४ वा वित्त आयोगाचा निधी मिळाला; परंतु तो निकषाप्रमाणेखर्च केला नाही. अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तपासणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला असून, त्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल.- संतोष हराळगटविकास अधिकारी

टॅग्स :Puneपुणे