शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

परतावा रक्कम वितरणात भ्रष्टाचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:32 IST

शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने काही शाळांनी

पुणे : शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने काही शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. सर्व शाळांना रकमेचे समान वितरण केले असल्याचा दावा शासनाकडून केला जातो. मात्र, शिक्षण विभागातील अधिकारी लाच घेऊन एकाच शाळेला तब्बल १६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करत असल्याची महिती गुरुवारी समोर आली. त्यामुळे आरटीई शुल्क परताव्याच्या रक्कम वितरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा संस्थाचालकांकडून केला जात आहे.जुनी सांगवी परिसरातील नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूलला गेल्या पाच वर्षांपासून आरटीई शुल्क परताव्याची रक्कमच दिली गेली नव्हती. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या शिक्षण विभागाकडून दाद दिली जात नव्हती. त्यात शुल्क परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागातील महिला कार्यालय अधीक्षक व लिपिकाने लाच मागितली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संबंधित कार्यालय अधीक्षक व लिपिकाला ५0 हजार रुपये रकमेची लाच घेताना पकडले. त्यामुळे शुल्क परताव्याच्या रकमेचे समान वाटप केले जात नाही. तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना लाच दिल्यानंतर संस्थाचालकांना ही रक्कम मिळते, असे दिसून येत आहे.शिक्षण विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही शुल्क परताव्याची रक्कम मिळत नसल्याने संस्थाचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने रक्कम द्यावी यासाठी संस्थाचालकांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तरीही पूर्ण रक्कम दिली जात नाही. परंतु, सर्व शाळांना समान प्रमाणात रकमेचे वितरण केले, असा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. रकमेचे समान वितरण केले असते तर एकाच वेळी एकाच शाळेला तब्बल १६ लाख रुपयांचे वितरण का करावे लागले? असा प्रश्न उपस्थित होतो.नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉमनिक लोबो म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून आमच्या शाळेला आरटीई शुल्क परताव्याचा एकही रुपया मिळाला नाही. शिक्षण विभागाकडे पंधरा ते सोळा वेळा पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी रक्कम वितरित करण्यासाठी लाच मागितली. त्यानंतर संबंधितांना अटक करण्यात आली. आमच्या शाळेत आरटीईच्या ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. शुल्क वितरणात मोठा घोटाळा झाल्याचा पत्रव्यवहार मी शिक्षण विभागाकडे केला होता. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची शक्यता आहे.