शिरूर : शिरूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती प्रभावीपणे कार्यरत असून, या समितीने गेल्या चार वर्षांत ३५० कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त करण्यात यश मिळविले आहे. या समितीच्या सदस्या शोभना पाचंगे या वर्षभर नियमित ठाण्यात उपस्थित राहून महिलांच्या समस्यांचे निराकरण करीत असल्याचे वास्तव आहे.शिरूर पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कर्मचारी हे बसत असलेल्या हॉलसमोर महिला दक्षता समितीचा ठळक फलक आहे. हॉलमध्ये पोलिसांनाच बसण्यास पुरेशी जागा नाही, अशा स्थितीत अधिकारी महिला दक्षता समिती सदस्यांसाठी बसण्यास जागा उपलब्ध करून देतात, हे विशेष.याठिकाणी बसून पाचंगे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्न करतात. वास्तविक या समितीसाठी स्वतंत्र कक्ष अपेक्षित आहे. मात्र, जिथे पोलिसांनाच जागा अपुरी आहे तेथे स्वतंत्र कक्ष उपलब्ध करणे शक्य नाही. महिला दक्षता समिती या फलक असल्याने महिलांना या समितीशी संपर्क साधणे सोपे जाते. पाचंगे या नियमित उपस्थित राहत असल्याने महिलांना संपर्क साधणे शक्य होते. (वार्ताहर)
विभक्त होण्यापासून ३५0 कुटुंबे परावृत्त
By admin | Updated: January 12, 2015 23:08 IST