शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा घेतली, नियुक्ती पत्रे देण्याआधी भरतीच केली रद्द; सरकारचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 09:58 IST

विश्वासघात केल्याचा संतप्त उमेदवारांचा आरोप

- अमोल अवचितेपुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भरती प्रक्रियाच रद्द केल्याचे पत्र त्यांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परस्पर निर्णय घेऊन सरकारने विश्वासघात केला. स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या का होणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.तत्कालीन ‘महापोर्टल’तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल  जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी जानेवारी ते मार्च २०२० या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. ‘लॉकडाऊन’मुळे काही उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होऊ शकली नाही. ‘लॉकडाऊन’संपताच प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल, असे विभागाकडून पात्र सांगण्यात आले. मात्र, परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.१३२ उमेदवार होणार नोकरीपासून वंचितयामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळालेले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.