शहरं
Join us  
Trending Stories
1
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
2
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
3
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
4
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
5
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
6
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
7
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
8
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
9
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
10
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
11
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
12
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
13
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
14
Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
15
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
16
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
17
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
18
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
19
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
20
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

सव्वातीन लाखांची वसुली, धान्य घोटाळ्यातील अधिकाऱ्याकडून वसुलीचे जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:06 AM

शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे.

विशाल शिर्के पुणे : शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, दोषींकडून व्याजासह प्रत्येकी ३ लाख २१ हजार ६५५ रुपयांप्रमाणे २२ लाख ५१ हजार ५८५ रुपयांची वसुली करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ९ ते २४ डिसेंबर २०१० या कालावधीत शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली होती. त्यात गव्हाच्या ६ हजार ६२९ गोण्या, तांदूळ ५ हजार ४४ आणि तूरडाळ १० किलो कमी अढळली होती. तर, पामतेल १८ हजार ५१८ लिटर अधिक आढळले होते. गहू ६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख २० हजार ७१५ रुपये आणि तांदूळ ९१० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख ९५ हजार २० रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले. तर, तूरडाळ ५,५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ४४ हजार, अशी ४५ लाख ५९ हजार ७३५ रुपयांची रक्कम वसूल होणे गरजेचे होते.सहायक संचालक पुरवठा विभागाने १० मार्च २०११ ते १९ मार्च २०११ या कालावधीत त्याच घोटाळ्यासाठी पुन्हा गोदामाची फेरतपासणी केली. त्यात गहू २ हजार ९५४ गोणी (१ हजार ४७७ क्विंटल) कमी आढळून आला. त्याची६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करावी, असा अभिप्राय दिला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.>दीड टक्का व्याजाने पैसे घेणारजिल्हाधिकारी राव यांनी समितीच्या अहवालावर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांकडून अपहार झालेली ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची रक्कम मार्च २०११पासून मार्च २०१८पर्यंत दीड टक्का व्याजाने वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अपहार झालेली रक्कम आणि व्याजाचे १२ लाख ६१ हजार ९९५ रुपये मिळून २२ लाख ५१ हजार ५८५ रुपये दोषींकडून वसूल करावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही आस्थापना संकलनाने करावी, असेही त्यात म्हटले आहे.दोषी अधिकारी समितीने नोंदविलेला शेरा१) प्रदीप पाटील, तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी२/६/२००८ पासून कार्यरत, अशी केवळ दोनदा गोदामाला भेट,मात्र ११ मे व ६ जून २०१० साठा तपासणी नाही, पर्यवेक्षणात उणीवा२) पी. एस. भगत, एस. व्ही. चंदनशिवे लेखे अभिलेख अपूर्ण ठेवले, धान्य नासाडीसएच. एस. निंबाळकर, एल. एल, लाटकर जबाबदार, पर्यवेक्षीय उणिवासर्व सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी३) पी. बी. बलकवडे, गोदामपाल लेखे अपूर्ण, सर्व माहिती असताना वरिष्ठांच्यानिदर्शनास आणून न देणे४) पी. कºहाडकर, गोदामपाल कामात हलगर्जीपणा, कार्यभार हस्तांतर न करणे,लेखे अपूर्ण, नोंदी न घेणे, खाडाखोड करणे,अभिलेखावर स्वाक्षरी न करणे अथवा न घेणे>‘लोकमत’ने संबंधित घोटाळ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आणले होते. तसेच, चौकशी समितीचा प्रशासनाकडून खेळखंडोबा केला जात असल्याचे दाखवून दिले होते. अखेर चौकशी समितीवर समिती नेमण्याचा कारभार झाल्यानंतर उपलेखापाल मंगेश खरात, उपलेखापाल एम. जी. वाघमारे आणि लेखाधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय एम. ए. कांबळे यांची समिती नेमली. अखेर या समितीने अधिकारी आणि कर्मचाºयांवर दोषनिश्चिती केली.