शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी कुलसचिवांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:28 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, अपिल घेणे यासाठी स्वतंत्र मानधन घेणे हे नियमानुसार नसल्यास ते लगेच थांबविण्यात येईल.

दीपक जाधव पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, अपिल घेणे यासाठी स्वतंत्र मानधन घेणे हे नियमानुसार नसल्यास ते लगेच थांबविण्यात येईल. आतापर्यंत ज्या आजी-माजी कुलसचिवांनी हे मानधन घेतले आहे, त्यांच्याकडून त्याची वसुली केली जाईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर मंगळवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय जनमाहिती अधिकाºयांच्या नेमणुकाकरण्यात येतील असे करमळकर यांनी स्पष्ट केले.माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व अपिल घेणे यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून दरमहा ६ हजार रूपये मानधन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मानधन घेण्याचा देशातील हा एकमेव प्रकार होता. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पै-पै करून जमा केलेल्या निधीचा हा अपव्यय असल्याने याविरोधात विद्यार्थी संघटना व स्वयंसेवी संस्थांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकंदरीतच माहिती अधिकार कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत कुलगुरूंकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, माहिती अधिकार कायद्यानुसार विभागनिहाय जनमाहिती अधिकारी नेमणुका करण्याबाबत विद्यापीठाकडून परिपत्रक काढले जाईल. माहिती अधिकार कायदा अधिकाधिक चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी पावले उचलली जातील.’’अधिकाºयांवर येणार जबाबदारीविद्यापीठाच्या अधिकाºयांवर जनमाहिती अधिकारी म्हणून जबाबदारी नसल्याने त्यांच्याकडून सर्रास माहिती नाकारण्याचे प्रकार घडत होते. कुलगुरूंनी ठामभूमिका घेऊन प्रत्येक विभागनिहाय माहिती अधिकारी नेमण्याचानिर्णय घेतल्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक अधिकाºयाला आता विद्यार्थ्यांच्या प्रति जबाबदारबनावे लागणार आहे. नागरिकांनी माहिती मागितल्यास ती उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाºयांनीच जनमाहिती अधिकारी म्हणून जबाबदारी पाहणे आवश्यक असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माहिती अधिकारी या दोन स्वतंत्र पदांची निर्मिती केली आहे. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने ८६, कोल्हापूर विद्यापीठाने ८९, सोलापूरने ३२, नांदेडने ३०, गोंडवानाने २०, औरंगाबादने ८२, नागपूरने १९२, जळगावने ४६, अमरावतीने ७६ जनमाहिती अधिकाºयांची नेमणूक केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र केवळ २ माहिती अधिकारी कार्यरत आहेत.