--
भोर : भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्ष व्हीप असताना माझ्याविरोधात पक्षातील सदस्याने बंडखोरी केल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षश्रेष्ठींनी याची गांभीर्याने दखल घेऊन पक्षादेश डावलून बंडखोरी करणाऱ्यावर शिस्तभांगाची कारवाई करावी आणि मला सन्मानाने एक महिन्याच्या आत सभापतिपद द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य लहू शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
भोर पंचायत समिती सभापती निवडीसंदर्भातील घडामोडींबाबत लहू शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुढील माहिती दिली. यावेळी माजी सभापती व विद्यमान सदस्य मंगल बोडके उपस्थित होते.
शेलार म्हणाले की, भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्या ४ आहे, तर काँग्रेस शिवसेना प्रत्येकी एक सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे भोर पंचायत समिती व राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असल्याने पक्षश्रेष्ठींनी सभापतिपदाची संधी सर्वांनी घ्यावी, असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे श्रीधर किंद्रे यांनी आपल्या सभापतिपदाचा एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला असल्याने सभापतिपदाची निवडणूक गुरुवार (दि. १८) रोजी झाली. त्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी लहूनाना शेलार यांच्या नावाचा सभापतिपदासाठी व्हिप काढून त्यांना
मतदान करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांनी शेवटच्या दहा मिनिटांत आदेश डावलून सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याबरोबर शिवसेनेच्या पूनम पांगारे यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक झाली. पक्षाची बदनामी नको म्हणून स्वत लहू शेलार यांनी मतदान जाधव यांना केले. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शेलार यांना पुढील सहा महिने सभापतिपद देऊ असे जाहीर केले परंतु हे खोटे असून याबाबत कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही असे लहू शेलार यांनी सांगितले. अशाच पध्दतीने २०१७ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करुनही अचानक शिवसेनेतील कुणाल साळुंके याना राष्ट्रवादीत आणून माझे तिकीट कापून साळुंके यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा त्यानी पक्षाला रामराम केला. अशा पध्दतीने माझ्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलून बंडखोरी करणाऱ्या वर शिस्तभंगाची कारवाई करुन मला एक महिन्यात सन्मानाने सभापतिपद द्यावे अशी लहू शेलार यांनी केली आहे.
--
चौकट
पक्षाचा आदेश असतानाही बंडाखोरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीचा लेखी आदेश आणि व्हीप बजावला असतानाही आदेश डावलून सभापतिपदासाठी दमयंती जाधव यांनी बंडखोरी केली त्यांना सूचक झालेल्या श्रीधर किंद्रे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
--