शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो आगाराचे अर्थकारण कोलमडले

By admin | Updated: September 4, 2016 04:07 IST

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे

- बी. एम. काळे , जेजुरी

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारण पूर्णपणे कोसळले आहे. येथे भरणाऱ्या बाजारावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. दररोज सकाळी स्थानिक शेतकरी, व्यापारी येथील बेलसर ग्रामपंचायतीसमोर एकत्र येतात. एकत्र बसून मुंबई, पुणे आदी भागातील बाजारभाव विचारून इथला खरेदीचा बाजार ठरतो. व्यापारी माल खरेदी करून शेतकऱ्याला ठोक रक्कम देऊन व्यवहार पूर्ण करतात. सगळीकडेच बाजारभाव कोसळल्याने इथल्याही बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी लाख-दीड लाख खर्च करून उत्पन्न मात्र निम्मेही होणार नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले आहे. या बाजारामुळे किमान खर्च तरी निघणार असल्याने शेतकरी बाजारात टोमॅटोची विक्री करीत आहेत. बेलसर परिसरात एक एकरापासून ते सात-आठ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. सुमारे पाचशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर १०५७, अक्षय, जेके ८११, आणि रसिका या जातीच्या टोमॅटोची लागवड झालेली आहे. गेल्या महिनाभरापासून येथे व्यापारी टोमॅटोच्या खरेदीसाठी ठाण मांडून बसलेले आहेत; मात्र बाजारभाव उठत नसल्याने शेतकरीवर्गात मोठी चिंता आहे. दररोज ठरणाऱ्या बाजारभावाच्या वेळी शेतकरी व व्यापाऱ्यांत चांगलीच चकमक झडत आहे; मात्र दोघांना ही गरज असल्याने तोडगाही निघत असल्याने बाजार सुरळीत पार पडत आहे. पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे कॅरेट पाठविले, तर सर्व खर्च वजा जाता २५ किंवा ३० किलोंच्या कॅरेटला ५० ते ६० रुपयेच हातात येत असल्याने नाराजी आहे. येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मामा गरूड, बाळासाहेब जगताप, सुनील गरूड, लक्षमण जगताप, प्रकाश बुधे, बंडू जगताप, बाळू बुधे, कैलास बनकर, नितीन गरूड, बाळासाहेब झगडे,चंद्रकांत लडकत यांनी मात्र यंदा टोमॅटो उत्पादक चांगलेच अडचणीत आले असल्याचे म्हटले आहे. इथे दररोज भरणाऱ्या बाजारावरच भवितव्य अवलंबून असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. हवामान खात्याने या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे जाहीर केल्याने या वर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव राहील अशी खात्री वाटल्यानेच शेतकऱ्यांनी बेलसर, वाळुंज, निळुंज, साकुर्डे, कोथळे, भोसलेवाडी, राणमळा, धालेवाडी, पारगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. या संपूर्ण परिसरात एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झालेली आहे; मात्र हवामान खात्याचा अंदाज फोल ठरल्याने सर्वत्रच टोमॅटोची पिके जोरदार आल्याने बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे.